Morjim News: Dainik Gomantak
गोवा

Morjim News: मोरजीतील भूमिका मंदिर देवस्थानच्या विहरीत पडला रेडा

अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले विहिरीबाहेर

गोमंतक ऑनलाईन टीम

Morjim News: मोरजी येथील भूमिका मंदिर देवस्थानच्या विहरीत आज एक रेडा पडला होता. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनी या रेड्याला विहिरीबाहेर काढण्यात यश आले.

या रेड्याला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. पावसामुळे ही विहीर पाण्याने बऱ्यापैकी भरलेली होती. त्यामुळे पाण्यात पडलेला रेडा वरवरच पोहत थांबला होता.

पण विहिरीच्या भींतीला पकडण्यासाठी काहीच नसल्याने तिथे फार काळ थांबता आले नसते. दरम्यान, याची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करत या रेड्याला विहिरीबाहेर काढण्यात आले.

अग्निशमन दलाचे जयराम मळीक यांच्या मार्गदर्शनाखाली जवान सहदेव परब, श्रीनेष कोरखंडकर, विराज किनळेकर, बया वरक यांनी ही कामगिरी पार पाडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT