Bicholim Highschool News Dainik Gomantak
गोवा

Bicholim Highschool News: डिचोलीतील शाळेत विद्यार्थिनींना श्वासोच्छवासाचा त्रास; 10 विद्यार्थिनी रूग्णालयात दाखल

4 मुलींना म्हापसा रूग्णालयात हलवणार; पोलिस चौकशी सुरू

Akshay Nirmale

Bicholim Highschool News: डिचोलीतील तालुक्यातील एका प्रतिष्ठित हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संस्थेतीलल ज्युनियर कॉलेजच्या 11 वी कला शाखेच्या वर्गातील मुलींना गुरूवारी अचानक श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सुमारे 10 मुलींना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

त्यातील 6 मुलींना उपचारानंतर आता बरे वाटत असून उर्वरीत 4 मुलींना म्हापसा जिल्हा रूग्णालयात हलविण्याच्या हालचाची सुरू आहेत. दरम्यान, या प्रकारामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

पेपर स्प्रे वापरल्यामुळे या मुलींना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

विशेष म्हणजे, 8 दिवसांपुर्वी या शाळेत असाच प्रकार घडला होता. तेव्हा २ मुलींना त्रास झाला होता. त्यावेळी एका विद्यार्थ्यांला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. कालपासूनच तो विद्यार्थी पुन्हा शाळेत येऊ लागला होता, असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, तेव्हा तपासणीवेळी काही विद्यार्थीनींच्या सॅकमध्ये ई-सिगारेट सापडल्याचेही सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT