Cemetery in Vasco Dainik Gomantak
गोवा

वास्कोतील कब्रस्तानात थडग्यांची मोडतोड

किरकोळ तणाव: रेल्वे महामंडळाच्या कंत्राटदाराकडून कृत्य

दैनिक गोमन्तक

वास्को: संरक्षक भिंतीचे काम करताना रेल्वे महामंडळाच्या कंत्राटदाराने काही थडग्यांचे नुकसान केल्याने वास्को कब्रस्तान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने जमीन खोदण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कब्रस्तानात मृतात्म्यांसाठी प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या एक व्यक्तीला काही थडग्यांची मोडतोड झाल्याचे दिसून आले. त्याने त्या प्रकाराचा व्हिडिओ तयार केला. या प्रकाराची माहिती मुस्लिम बांधवांना देताच त्यांचा एक गट घटनास्थळी धावत आला. त्यांनी पोलिसांनाही बोलावून कंत्राटदाराने निष्काळजीपणा केल्याची माहिती दिली. पोलिसांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्याचा सल्ला दिला.

आज संयुक्त पाहणी: टेकडीवरून दगड येऊन कब्रस्तानातील कबरींचे नुकसान होत असल्याने काम करताना काळजी घेण्याचा इशाराही ठेकेदाराला यापूर्वी दिला असल्याचे काही मुस्लिम बांधवांनी सांगितले. रविवारी संध्याकाळी संरक्षक भिंतीचे काम करताना काही कामगार जेसीबीच्या साहाय्याने माती हलवताना दिसले. सोमवारी वास्कोचे आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर, वास्कोचे माजी आमदार जुझे फिलिप डिसोझा, रेल्वे अधिकारी, पोलिस पाहणी करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT