गुरुवारी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे असल्याचे वृत्त आहे. लंडनला उड्डाण केल्यानंतर लगेचच हे विमान कोसळले आणि अपघाताच्या वेळी त्यात सुमारे २४२ प्रवासी होते.
लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबादमध्ये कोसळल्याच्या बातमीने मला खूप दुःख झाले आहे. या दुःखद काळात माझ्या प्रार्थना विमानातील सर्व प्रवाशांसोबत आहेत. - मुख्यमंत्री
आज दुपारी अहमदाबाद गुजरात येथे एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे फतोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचा १४ जून रोजी होणारा वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ एका विमानाचा उड्डाणादरम्यान अपघात झाल्याचे वृत्त आहे. विमानात २४२ हून अधिक प्रवासी होते. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका फ्लॅटमध्ये गुड्डेमळ-सावर्डे येथील रहिवासी समीर शेखचा कुजलेला मृतदेह चादरीत गुंडाळलेला आढळला.
मये-वायंगिणी पंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदी अनुक्रमे वासुदेव गावकर आणि सीमा आरोंदेकर. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत दोघांचीही बिनविरोध निवड.
सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी गावातील आणि अंतर्गत रस्त्यांवर बसेस तैनात करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. नियमांचे पालन न केल्यास मडगावमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅरेज आणि पार्किंगवर कारवाईचा इशारा.
डॉक्टरांच्या अपमानानंतर मुख्यमंत्र्यांनी विश्वजित राणेंना संरक्षण दिल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे.गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात कारवाई करण्याची किंवा त्यांच्या मंत्र्यांना काढून टाकण्याची हिंमत नाही. डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांचा सार्वजनिकरित्या अपमान करणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात ते अपयशी ठरले.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वेर्णा जंक्शनवर ओव्हर ब्रिज बांधण्याची आमची योजना आहे. आधीच तपासणी करण्यात आली आहे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
कुडचडे मालमत्तेच्या वादातून ग्रामस्थांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, कुडचडे पोलिसांनी बीएनएसएसच्या कलम १७० अंतर्गत आठ जणांना अटक केली आहे. आज कुडचडे पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी पीएसआय मयूर पंचिकर यांनी ही माहिती दिली.
कारवार मडगाव महामार्गावरील. आज संध्याकाळी पाटे बाळ्ळी येथील रेल्वे पुलाखाली 60 पेक्षा जास्त टायर असलेला अवजड मोठा बॉयलर रस्त्यावर अडकून पडल्याने महामार्गावर रस्ता बंद झाला त्यामुळे या मार्गावर वाहतूक करणाऱ्या शेकडो वाहन चालकांना अनेक तास पर्यंत महामार्ग खुला होण्याची वाट पहावी लागली
जोफीलनगर - फोंडा येथील अपहरण केलेला भंगार अड्डयाचा व्यवसायिक संदीप चौधरी हा बंगळुरू येथे फोंडा पोलीस पथकाला सापडला. मात्र अपहरणकर्त्यांनी पोलिसांना दिला गुंगारा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.