गोमन्‍तक
गोमन्‍तक Dainik Gomantak
गोवा

‘गोमन्‍तक’तर्फे नामांकित ब्रँडस्‌चा मिळणार उद्या सन्‍मान

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा मुक्तीपासून राज्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देत राज्याच्या जडणघडणीला पाठबळ दिलेल्या गोव्याच्या ब्रँडस्‌चा सन्मान दैनिक ‘गोमन्तक’तर्फे सोमवार दि. 16 मे रोजी एका शानदार सोहळ्यात केला जाणार आहे. फक्त निमंत्रितांसाठी असलेला हा सोहळा संध्याकाळी 6.30 वाजता हॉटेल ‘सिदाद दी गोवा’ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तर विशेष अतिथी म्‍हणून माजी मुख्‍यमंत्री प्रतापसिंग राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत, लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्‍थिती असेल. राज्यातील एकूण 31 ब्रँडस्‌चा गौरव करण्‍यात येणार आहे. गोवा राज्य मुक्तीची 60 वर्षे साजरी करत आहे आणि ‘गोमन्तक’ही त्याचाच एक भाग बनून विविध क्षेत्रातील ब्रँडस्‌चा सन्मान करून आपला वाटा उचलत आहे.

हे आहेत सत्‍कारमूर्ती ब्रँडस्‌

डी. बी. बांदोडकर अँड सन्स प्रा. लि., कायनेको ग्रुप गोवा, नेस्ले किटकॅट, आर. एन. तालक अँड डेव्हलपर्स, जीनो फार्मास्युटिकल्स प्रा. लि., रियल ग्रुप ऑफ कंपनीज्‌, कॅम इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस, हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, श्री मल्लिकार्जुन ॲण्‍ड श्री चेतन मंजू देसाई कॉलेज, वेलनेस फॉरएव्हर मेडिकेअर लि., एएसजी आय हॉस्पिटल्स, मुष्टिफंड आर्यान हायर सेकंडरी स्कूल, राज हाऊसिंग, गोवा इस्पात लि., दुर्गा मोटर्स, नास्नोडकर ज्‍वेलर्स, एझाईल, डॉ. पृथ्वी आमोणकर, अभिगणेश इन्‍व्‍हेंस्‍टमेंट सर्व्हिसेस प्रा. लि., कोहिनूर ऑप्टिशियन्स, मोंटाना कन्फेक्शनर्स प्रा. लि., प्राची ॲक्वा मिनरल प्रा. लि., कुकुज टॉयज्‌, पराडकर फर्निचर, नोबर्टस्‌‌ फिटनेस स्टुडिओ, ईपी बायोकंपोझिटस्‌ लि., विठ्ठल ज्‍वेलर्स, मे. बाबू फार्मा, हॉटेल मारुती वडा कोंबडा, आदित्य वडा पाव अँड डोसा, आरजी स्टोन युरॉलॉजी अँड लेपरोस्कोपी हॉस्पिटल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: पर्वरी येथे मराठी राजभाषा साहित्य संमेलनास सुरुवात

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Panaji News : भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

Mark Zuckerberg यांचा पगार फक्त 83 रुपये, पण सुरक्षेवर होतो कोट्यवधींचा खर्च; उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब पाहून व्हाल थक्क!

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

SCROLL FOR NEXT