Mapusa Cylinder Blast Dainik Gomantak
गोवा

Mapusa Cylinder Blast: म्हापसा सिलिंडर स्फोटप्रकरणी हिल टॉप रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांना अटक

निष्काळजीपणाचा आरोप; गॅस सिलिंडरसाठी निकृष्ट पाईप वापरली

Akshay Nirmale

Mapusa Cylinder Blast: म्हापसा येथील हिल टॉप बार अँड रेस्टॉरंटमध्ये २२ जानेवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता या रेस्टॉरंटच्या मालकांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवत त्यांना अटक केली आहे. पैकी एका मालकाचे नाव रामकृष्ण मयेकर असे आहे. तर सह मालक असलेल्या एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे.

म्हापसातील डांगी कॉलनी येथे ब्रीझ अपार्टमेंटमध्ये हे रेस्टॉरंट आहे. या घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेच्या सविस्तर चौकशीनंतर गॅस सिलिंडरसाठी निकृष्ट आणि बिघडलेल्या पाईपचा वापर केल्याचे लक्षात आले.

त्यामुळे त्यातून गॅस गळती होऊन ही घटना घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

अग्निशमन दलाच्या अहवालावरून पोलिसांनी रेस्टॉरंट मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांना पोलिस निरीक्षक म्हापसा परेश नाईक यांनी तत्काळ अटक केली.

पोलिसांनी उत्पादन शुल्क खात्याला रेस्टॉरंटचा परवाना रद्द करण्याबाबत पत्र लिहिले आहे. तसेच म्हापसा महापालिकेलाही रेस्टॉरंटचा व्यापार परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र लिहिले आहे.

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन, म्हापशाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

दरम्यान या स्फोटात दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मागील तीस वर्षांपासून हा बार सुरू आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की यात शेजारील फ्लॅटच्या भींती कोसळल्या आहेत शिवाय काही लोकांच्या घरातील किचनचे नुकसान झाले आहे. याशिवाय चारचाकी आणि दुचाकींचे देखील नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Goa High Court Promotion Case: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; कायदा विभागातील 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT