Margao Market
Margao Market 
गोवा

मडगावातील दोन्ही बाजारपेठा काही दिवसांसाठी बंद

Tukaram Govekar

नावेली

मडगावातील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट शुक्रवारपर्यंत (ता. २४) व न्यू मार्केट रविवारपर्यंत (ता. २६) बंद ठेवण्यात आले आहे.
न्यू मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने एक गेट खुली करून त्यातील काही व्यापाऱ्यांनी मडगाव नगरपालिकेजवळ विनंती करून दुकानात खराब होणारा माल बाहेर काढण्यासाठी सोमवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत वेळ मागून घेतला होता. त्यानुसार पालिकेने व्यापाऱ्यांना सामान बाहेर काढण्यासाठी वेळ दिला व दुपारी दुकाने बंद केल्यानंतर औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले, अशी माहिती न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देविदास बोरकर यांनी दिली.
वास्कोत ज्या पद्धतीने कोरोनाचा फैलाव होत आहे त्याची पुनरावृत्ती मडगावात होऊ नये यासाठी बाजारातील दुकानदारांची खबरदारी घेऊन सर्व हेवेदावे बाजूला ठेवून न्यू मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या हितासाठी आठ दिवस न्यू मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, असे बोरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी मोहनदास एच. बोरकर व मोहनदास बोरकर उपस्थित होते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केवळ न्यू मार्केटच नाही, तर संपूर्ण मडगाव आठ दिवस बंद ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात विरोधी पक्षनेते तसेच मडगावचे आमदार दिगंबर कामत, मडगाव पालिका नगराध्यक्ष पुजा नाईक, गांधी मार्केट तयार कपडे भाजी व फळविक्रेते संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांच्याशी चर्चा केली आहे, असे त्यांनी नमूद केले.
मडगावातील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट शुक्रवारपर्यंत (ता. २४) बंद ठेवण्यात आले असून मडगावातील न्यू मार्केट रविवारपर्यंत (ता. २६) बंद ठेवण्यात आले आहे, असे बोरकर यांनी सांगितले.

Goa Goa Goa Goa Goa Goa

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT