Borim Panchayat  Dainik Gomantak
गोवा

ISKCON Project In Borim Goa: ...अखेर पोलिस बंदोबस्तात बोरी सरपंचांना पंचायतीबाहेर काढले; ग्रामस्थ आक्रमक

इस्कॉन प्रकल्पाला विरोध : 16 तारखेला पंचायतीची पाक्षिक बैठक होणार

गोमन्तक डिजिटल टीम

Borim villagers oppose ISKCON project

बोरी पंचायत क्षेत्रातील इस्कॉन प्रकल्पासाठीच्या रस्त्याचे काम त्वरित बंद करा, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी पंचायत मंडळ सदस्यांना धारेवर धरले. शनिवारी इस्कॉनचे प्रतिनिधी या प्रकल्पासंबंधी माहिती देण्यासाठी पंचायतीत आले होते;

पण ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे न ऐकता हा प्रकल्प रद्द केल्याचे पत्र द्या, अशा धोषा सरपंचांकडे लावला. शेवटी पोलिस बंदोबस्तात सरपंच दुमिंग वाझ व इतर पंचांना पंचायतीबाहेर काढले. सद्यस्थितीत रस्ता काम बंद ठेवण्याचा आदेश पंचायतीने दिला आहे.

बोरी पंचायत क्षेत्रात इस्कॉनचा प्रकल्प होत असून त्यासाठी सर्व खात्यांचे परवाने घेतले आहेत. या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता करण्यात येत असून याला काही ग्रामस्थांचा विरोध आहे. बोरी पंचायतीत ४ रोजी या ग्रामस्थांनी प्रकल्पाला व रस्त्याला विरोध असल्याचे पत्र दिले होते. इस्कॉनच्या प्रतिनिधींना पंचायतीत ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी बोलावले होते.

सरपंच वाझ म्हणाले, गेल्या ग्रामसभेत चार रोजी या प्रकल्पासंबंधी लोकांनी आक्षेप नोंदवला आहे. 16 तारखेला पंचायतीची पाक्षिक बैठक होणार असून यावेळी जे काही ठरते ते सांगतो, असे सांगितले.

तरीही ग्रामस्थ ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यामुळे पंचायतीने रस्ता काम बंद करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. यावर लोकांचे समाधान झाले नाही. शेवटी सरपंच व पंचांना पोलिस बंदोबस्तात बाहेर काढले. यावेळी ग्रामस्थांनी रस्ता काम बंद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT