Borim Canter hits truck; driver is serious Dainik Gomantak
गोवा

बोरीत कँटरची ट्रकला धडक; चालक गंभीर

कँटर चालकाला जबर मार लागल्याने त्याला उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

बोरी: बोरी सर्कल येथे आज पहाटे 4 च्या सुमारास कँटरने ट्रकला जोरदार धडक दिल्याने कँटरच्या दर्शनी भागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कँटर चालकाला जबर मार लागल्याने त्याला उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. आज शुक्रवारी बोरी फुलावरून वास्को येथून बेळगावच्या दिशेने जाणारा एमएच 12 जी 0605 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक बोरी पुलाच्या जोडरस्त्यावरून सर्कलकडे येत असताना मागून येणाऱ्या (एमएच 04एफ यू 3305) या कँटरने जोरदार धडक दिली.

या धडकेत कँटरचा दर्शनी भागाचा चुराडा झाला. कँटरचे केबीन पूर्णपणे उध्वस्त झाले. कँटर चालक यात गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ स्थितीत त्याला फोंडा पोलिसांनी प्रथम फोंड्याच्या आयडी इस्पितळात व नंतर बांबोळीत उपचारार्थ नेले. हा अपघात एवढा जबरदस्त होता, की आवाजाने लोक जागे होऊन अपघातस्थळी आले. फोंडा पोलिसांनी पंचनामा करून कँटर क्रेनच्या मदतीने हटवून रस्ता मोकळा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT