book release & awards ceremony Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik: समाजाप्रती कृतज्ञभाव ठेवून केलेले समाजकार्य ठरते आदर्श : खासदार श्रीपाद नाईक

महात्मा गांधींनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले साध्या, सोप्या भाषेत

दैनिक गोमन्तक

समाजाप्रती कृतज्ञभाव ठेवून समाजकार्य केले ते आदर्श ठरते. महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, भाऊसाहेब बांदोडकर यांचा एक टक्का जरी आदर्श घेतला तर समाज उन्नती करेल. महात्मा गांधींनी जीवनाचे तत्वज्ञान साध्या, सोप्या भाषेत सांगितले, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

समाजोन्नती संघटनेतर्फे ‘आयएमबी’च्या छोटेखानी सभागृहात झालेल्या गांधी जयंती सोहळ्यात नाईक बोलत होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, उद्योजक डॉ. प्रफुल्ल हेदे, विश्वशांती बहुद्देशीय सेवाभावी संस्था, पुणेचे अध्यक्ष संजय चौधरी, वक्ते ॲड. एन डी पाटील, सत्कारमूर्ती लेखिका ज्योती बांदेकर, ज्येष्ठ दलित समाजसेवक तुकाराम आर्लेकर, संस्थेचे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर, सरचिटणीस ध्रुवा कुडाळकर उपस्थित होते.

यावेळी ज्योती बांदेकर व तुकाराम आर्लेकर यांचा सत्कार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. वाटचाल या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. प्रफुल्ल हेदे यांच्या हस्ते करण्यात आले.

विश्वासाच्या जोरावर चळवळी

आजही गांधीजींची तत्वे केवळ भारतवर्षातच नव्हे तर जगभर चर्चिली जातात. त्यांनी स्वदेशी चळवळ, दांडियात्रा, मिठाचा सत्याग्रह अशा चळवळी विश्वासाच्या जोरावर उभारल्या. लोकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता.

भाऊसाहेब बांदोडकर लौकीकार्थाने उच्च शिक्षित नव्हते परंतु त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले, असे प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.

"भाऊसाहेब बांदोडकर यानी सत्तेचा उपयोग समाजासाठी केला. स्वतःचे खिसे भरण्याचे साधन म्हणजे राजकारण, असे मानले तर तर समाज कुठल्या दिशेने जाणार? याचा विचार करणे गरजेचे आहे."

- श्रीपाद नाईक

"भगवान बुद्धानंतर प्रति भगवान बुद्ध म्हणून गांधीजींचेच नाव घ्यावे लागेल. त्यांनी दिनदुबळ्यांना एकत्र आणून स्वातंत्र्याची चळवळ चालवली. सत्ता भोगलेल्या नेत्यांपेक्षा राष्ट्राचे खरे नेतृत्व गांधीजींनी केले. ७५ वर्षे या देशात लोकशाही टिकण्याचे श्रेय त्यांनाच जाते."

- ॲड. एन डी पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT