Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: शेकोटीने बंद पाडला रेल्वेचा सिग्नल; केबल जळाल्याने मडगावात रेल्वे सेवा चार तास ठप्प

Margao Railway News: सिग्‍नल यंत्रणा बंद पडल्‍याने कोकण रेल्‍वे मार्ग तसेच दक्षिण-पश्‍चिम रेल्‍वे मार्गावरील कित्‍येक रेल्वेगाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवल्‍या.

Sameer Panditrao

Fire at Margao Railway Station Signal Cable Incident

मडगाव: पहाटेच्‍यावेळी थंडीपासून बचाव करण्‍यासाठी मडगाव रेल्‍वे स्‍थानकाजवळ काहीजणांनी शेकोटी पेटविली होती. त्‍या शेकोटीची धग रेल्‍वेची सिग्‍नल यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या केबलला लागून संपूर्ण केबल जळाल्‍याने गोव्‍यातून बाहेरच्‍या राज्‍यांना संपर्कासाठी वापरली जाणारी यंत्रणा तब्‍बल चार तास कोलमडली.

यात रेल्‍वेच्‍या संदेशवहन प्रणालीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकण रेल्‍वे स्‍थानकाच्‍या आवाराबाहेर हा प्रकार घडला. या भागात रेल्‍वे स्‍थानकावर काम करणारे काही हमाल राहतात. याच हमालाच्‍या एका जत्‍थ्‍याने ही शेकोटी पेटविली होती. सिग्‍नल यंत्रणा बंद पडल्‍याने कोकण रेल्‍वे मार्ग तसेच दक्षिण-पश्‍चिम रेल्‍वे मार्गावरील कित्‍येक रेल्वेगाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवल्‍या. शेवटी रेल्‍वेच्‍या कर्मचाऱ्यांचे कवच देऊन या रेलगाड्या हळूहळू मार्गस्‍थ केल्‍या.

यासंदर्भात कोकण रेल्‍वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्‍याशी संपर्क साधला असता, चार तासांच्‍या अथक परिश्रमानंतर सिग्‍नल यंत्रणा पुन्‍हा कार्यान्वित केली. मात्र, त्‍यामुळे काही रेल्‍वे उशिरा धावल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यासंदर्भात मडगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, अद्याप कुणाच्‍याही विरोधात तक्रार नोंदविलेली नाही, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT