Court Dainik Gomantak
गोवा

Panaji Mala Lake Update: मळ्यातील ‘सील’ केलेल्या घरांचा अहवाल सादर करा, न्यायालयाचा महानगरपालिकेला आदेश

high levels of fecal coliform bacteria found in mala lake water: मळा तलावातील माशांचा मृत्यू आणि पाण्यात आढळलेले ‘फेकल कोलिफॉर्म’ यासारख्या गंभीर बाबींवर स्वेच्छा दखल घेत गोवा खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: मळा तलावातील माशांचा मृत्यू आणि पाण्यात आढळलेले ‘फेकल कोलिफॉर्म’ यासारख्या गंभीर बाबींवर स्वेच्छा दखल घेत गोवा खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. मळा तलावाच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेली घरे सील करण्यात आली होती. त्या घरांच्या सद्यस्थितीबाबत अहवाल एका आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने महानगरपालिकेला (सीसीपी) दिले आहेत.

न्यायालयाने या सात घरांपैकी किती घरांनी प्रत्यक्षात सांडपाणी जोडणी घेतली आहे आणि किती घरमालकांनी जोडणीसाठी अर्ज केले आहेत, याची सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या प्रतिज्ञापत्रातून समोर येईल. मळा तलावाच्या परिसरात आढळलेली खराब झालेली सांडपाणी वाहिनी दुरुस्त करण्याचे काम सध्या गोवा सांडपाणी महामंडळाकडून सुरू असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. सर्व उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशी सूचना खंडपीठाने केली आहे. दरम्यान, मळा तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेतली होती.

महानगरपालिका, जलस्रोत विभाग आणि मत्स्यव्यवसाय संचालनालयाच्या संयुक्त तपासणीत तलावाच्या पश्चिम बाजूला असलेल्या निवासी क्षेत्रातील घरगुती सांडपाणी थेट पावसाळी नाल्यांद्वारे तलावात मिसळत असल्याचे समोर आले होते. ६ मे २०२६ रोजी न्यायालयाने घरोघरी तपासणी करून बेकायदेशीर सांडपाणी जोडणी सील करण्याचे आदेश दिले होते.

३८ घरांवर कारवाई

प्रदूषण (Pollution) नियंत्रण मंडळाला तलावातील पाण्याची पुन्हा तपासणी करण्याचे आणि त्याचा अंतरिम अहवाल पुढील सुनावणीच्या तारखेला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तलावात थेट किंवा अप्रत्यक्षपणे सांडपाणी सोडणाऱ्या ३८ घरांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या काही घरांनी सेप्टिक टँक बांधले आहेत, तर काही घरांनी सांडपाणी वाहिनीशी जोडणी करण्यासाठी अर्ज केले आहेत. तसेच सुमारे ८ घरांचे रहिवासी सध्या तात्पुरत्या स्वरूपात सार्वजनिक शौचालयांचा वापर करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

SCROLL FOR NEXT