bombay high court goa bench Dainik Gomantak
गोवा

गोव्यात बेकायदेशीर जमीन भराव करणाऱ्यांना 1.69 कोटींचा दंड, हायकोर्टाने दाखवला इंगा; काशिनाथ शेट्येंच्या याचिकेवर मोठा निकाल!

bombay high court goa bench illegal land filling order: बेकायदेशीर जमीन भराव करून नैसर्गिक हानी करणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठा दणका दिला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: बेकायदेशीर जमीन भराव करून नैसर्गिक हानी करणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. तिसवाडी तालुक्यातील मोरोंबी-ओ-पिकेनो (सर्व्हे क्र. ५८/१) येथील जमीन मूळ स्थितीत आणण्यासाठी १ कोटी ६९ लाख ८७ हजार ८७८ रुपये खर्च अपेक्षित असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. ही रक्कम संबंधित जमीनधारकांकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे झालेले नुकसान आणि त्याची भरपाई किती असावी, याचे मूल्यमापन मात्र अद्याप करण्यात आलेले नाही.

काशिनाथ जयराम शेट्ये आणि इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने (Court) नियुक्त केलेल्या ‘टास्क फोर्स’ने १८ मे रोजी केलेल्या पाहणीनंतर जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्राथमिक अंदाज निश्चित केला. या अहवालानुसार, बेकायदेशीर भरावामुळे बाधित झालेली जमीन पूर्ववत करण्यासाठी सुमारे १.६९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

खंडपीठाने प्रतिवाद्यांना संबंधित जमिनीवर कोणत्याही प्रकारचा नवीन भराव टाकणे, उत्खनन करणे किंवा जमिनीचे स्वरूप बदलणे यास सक्त मनाई केली आहे. तसेच, जमिनीवरील प्रत्यक्ष ताबा असलेल्या व्यक्तींसह सर्व्हे नोंदींमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांनी पुनरुज्जीवनासाठी आवश्यक रक्कम जमा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

वसंत कुडणेकरना प्रतिवादी करण्‍याचे निर्देश

सुनावणीदरम्यान संबंधित जमिनीच्या उताऱ्यावर वसंत कुडणेकर यांचे नाव असल्याचे निदर्शनास आले. त्यांचा अचूक पत्ता शोधून त्यांना या प्रकरणात प्रतिवादी म्हणून सामील करून घेण्याचे निर्देश न्यायालयाने तिसवाडी उपजिल्हाधिकारी आणि मेरशी पंचायत सचिवांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जून रोजी होणार आहे.

नुकसानीचा हिशेब अद्याप बाकी

टास्क फोर्सने सध्या केवळ जमीन पूर्ववत करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर केला आहे. मात्र, बेकायदेशीर भरावामुळे पर्यावरण, जलस्रोत आणि परिसंस्थेवर झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र मूल्यमापन अद्याप झालेले नाही. त्यामुळे भविष्यात संबंधितांवर आणखी आर्थिक दायित्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT