Bomb threat call recived yet again for Russian Charter flight Azur Airlines arriving to Goa. Dainik Gomantak
गोवा

Goa Flight Bomb Threat : पुन्हा बॉम्बची धमकी! गोव्यात येणारे अझूर एअरलाइन्स उझबेकिस्तानमध्ये वळवले

गोव्यात येणार्‍या अझूर एअरलाइन्सच्या रशियन चार्टर विमानाला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात येणार्‍या अझूर एअरलाइन्सच्या रशियन चार्टर विमानाला पुन्हा एकदा बॉम्बची धमकी मिळाली आहे. सूत्रांनी सांगितले की, गोवा विमानतळ संचालकांना बॉम्बची धमकी देणारा मेल आला आहे. (Goa Flight Bomb Threat)

त्यानंतर गोवा विमानतळाने अझूर एअरलाइन्सला ताबडतोब अलर्ट केले आणि 247 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स असलेल्या रशियन चार्टर फ्लाइटला तात्काळ वळवण्यात आले आणि उझबेकिस्तानमधील विमानतळावर उतरवण्यात आले आहे.

दरम्यान, पहाटे 3.30 च्या सुमारास धमकीच्या कॉलनंतर दाबोळी विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल आणि इतर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रशियन फ्लाइटच्या पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या रशियन चार्टर विमानात बॉम्ब असल्याची माहिती 9 जानेवारी रात्री उशिरा गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली होती. यानंतर 244 प्रवाशी असलेले हे विमान तातडीने जामनगर-गुजरात विमानतळाकडे वळवण्यात आले होते. तिथे रात्री 9.49 वाजता विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्शदीप सिंगने इन्स्टाग्रामवर चालवले 'क्लीनअप ड्राइव्ह'; विराट कोहलीसोबतची 'ती' व्हायरल रीलही केली डिलीट, नेमकं झालं काय?

Tourist Assault: कायदा हातात घेणाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करा, सिंधुदुर्गातील नागरिकांशी झालेला वाद व हल्ला निंदनीय- जितेश कामत

Goa Crime: दारूच्‍या नशेत जेवणाचे ताट उडवले लाथेने; मित्राचा केला खून, मोबोरमधील घटना: काचेची बाटली खुपसली गळ्यात

Konkan Tourism: पर्यटकांसाठी मोठी बातमी! कोकणात मान्सूनची चाहूल, सिंधुदुर्गातील समुद्री पर्यटनाला 'या' तारखेपर्यंत ब्रेक

Goa River Survey: नद्यांचा प्रवाह, पाण्याचा वेगही मोजणार; जल आयोग करणार पाहणी, शुक्रवारपासून सर्वेक्षणाला सुरवात

SCROLL FOR NEXT