Marzi Pestonji Shiamak Davar Dainik Gomantak
गोवा

Bollywood चे दोन दिग्गज डान्सर गोव्यातील मनोहर विमानतळाच्या प्रेमात, म्हणाले...

सुरू झाल्यापासून मनोहर विमानतळ सुसाट सुरू आहे. तसेच, दाबोळी विमानतळ देखील जोमात सुरू आहे.

Pramod Yadav

उत्तर गोव्यात नव्याने सुरू झालेले मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुसाट सुरू आहे. अनेकजण राज्यात येणारे पर्यटक मोपाला पहिली पसंती देत आहेत. अधुनिक आणि आकर्षक असलेल्या या विमानतळाचे सर्वांनीच कौतुक केले आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी मोपाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, नुकतेच बॉलिवूडच्या दोन दिग्गज डान्सर आणि नृत्य दिग्दर्शक याने मनोहर विमानतळाला भेट दिली. याचे फोटो सध्या समोर आले आहेत.

डान्सिंग उस्ताद मार्झी आणि नृत्यदिग्दर्शक श्यामक दावर यांचा अलिकडेच प्रवासानिमित्त मनोहर विमानतळाला भेटीचा योग आला. दोघांनीही विमानतळावरील आदरातिथ्याचा आनंद घेतला व विमानतळाचे कौतुक केले.

विमानतळावरील वातावरण आल्हादायक असून, येथील लोक देखील उत्तम आहेत. अशी प्रतिक्रिया मार्झीने दिली आहे. खूप सुंदर विमानतळ आणि उत्तम सुविधा अशा शब्दात श्यामक दावर यांनी विमानतळाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, मागील वर्षी 11 डिसेंबर 2022 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोपा येथील विमानतळाचे उद्धाटन करण्यात आले. याचवेळी या विमानतळाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर 05 जानेवारी 2023 रोजी विमानतळावरून पहिले उड्डाण आणि आगमन झाले.

सुरू झाल्यापासून मनोहर विमानतळ सुसाट सुरू आहे. तसेच, दाबोळी विमानतळ देखील जोमात सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT