Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Dainik Gomantak
गोवा

Rakul Preet Singh: रकुल प्रीतचं ठरलं! गोव्यात करणार लग्न; पण कोणासोबत, कधी? जाणून घ्या सविस्तर

सध्या रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी बँकॉकमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय करत आहेत.

Pramod Yadav

Rakul Preet Singh And Jackky Bhagnani: मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि निर्माता-अभिनेता जॅकी भगनानी यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत.

विविध माध्यमांवर प्रसिद्ध होत असलेल्या वृत्तानुसार, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला असून पुढील महिन्यात ते गोव्यात लग्न करणार आहेत. सध्या रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी बँकॉकमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय करत आहेत.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 2023 मध्ये लग्न करणार अशी चर्चा होती. जॅकी भगनानीचे वडील वासू भगनानी हे लग्न मोठ्या थाटात पार पाडण्यासाठी तयारी करत आहेत.

पण आता गोव्यात पुढच्या महिन्यात 22 फेब्रुवारीला अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करणार असून, केवळ मर्यादीत पाहुण्यांनाच आमंत्रित केले जाणार आहे. भगनानी यांचे कुटुंब अतिशय खाजगी असून लग्न खाजगी ठेवू इच्छित असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी बँकॉकमध्ये नवीन वर्षाच्या निमित्ताने बॅचलर पार्टीचा आनंद घेत आहेत. जॅकी भगनानीने 2021 साली रकुल सिंगच्या वाढदिवसाला आपले प्रेम व्यक्त केले होते.

रकुल प्रीत सिंगनेही तिच्या वाढदिवसानिमित्त जॅकी भगनानीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. रकुल प्रीत सिंहने जॅकी भगनानीला तिची सर्वोत्कृष्ट आणि खास भेट असल्याचे सांगितले होते.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. 2023 मध्येच दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा होती. आणि, जॅकी भगनानीचे वडील वासू भगनानी या लग्नाला भव्यदिव्य बनवण्याच्या तयारीत आहेत.

पण असे सांगितले जात आहे की 22 फेब्रुवारी 2024 रोजी दोघेही लग्न करणार आहेत, ज्यामध्ये फक्त काही खास पाहुण्यांना आमंत्रित केले जाईल. जॅकी भगनानीला हे लग्न खाजगी ठेवायचे आहे. मात्र, जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंगकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT