Kabir Bedi 80th Birthday Dainik Gomantak
गोवा

Kabir Bedi In Goa: 80व्या वर्षी कबीर बेदींचा गोव्यात रोमान्स, 29 वर्षांनी लहान असणाऱ्या बायकोसोबत 'ट्रिपल' सेलिब्रेशन; फोटो व्हायरल!

Kabir Bedi 80th Birthday Celebration In Goa: दिग्गज अभिनेते कबीर बेदी सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका आनंदाच्या टप्प्याचं सेलिब्रेशन करत आहेत.

Manish Jadhav

पणजी: दिग्गज अभिनेते कबीर बेदी सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका आनंदाच्या टप्प्याचं सेलिब्रेशन करत आहेत. नुकताच त्यांनी त्यांचा 80वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्यांनी पत्नी परवीन दुसांजसोबत गोव्याच्या निवांत समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद लुटला. ही ट्रिप केवळ त्यांच्या वाढदिवसासाठीच नव्हती, तर त्यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आणि एकत्र असण्याची 20 वर्षे साजरी करण्यासाठी देखील होती. कबीर बेदींनी या खास 'गेटअवे'चे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

कबीर बेदी आणि परवीन यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुंदर क्षण टिपले. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "आम्ही आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस, एकत्र असण्याची 20 वर्षे आणि माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्याच्या समुद्रकिनारी आलो होतो. आमची ही सुट्टी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, आत्मचिंतन करण्यासाठी आणि नात्याला नवसंजीवनी देण्यासाठी होती. आम्ही एकमेकांसोबतच निवांत वेळ घालवला. आता आम्ही परतलो आहोत!"

त्याचवेळी, या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. अभिनेत्री लिलेट दुबे यांनी "वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" अशी कमेंट केली. तर चाहत्यांनी या जोडीवर कौतुकाचा वर्षाव करत "देव तुम्हा दोघांना सुखात ठेवो" अशा प्रार्थना केल्या. एवढचं नाहीतर 80व्या वर्षातही कबीर बेदी यांचा उत्साह आणि त्यांची पत्नी परवीनसोबतची केमिस्ट्री पाहून अनेकजण थक्क झाले.

कबीर बेदी आणि परवीन दुसांज यांचे लग्न 2016 मध्ये झाले होते. त्यावेळी त्यांच्यातील 29 वर्षांच्या वयातील अंतरामुळे सोशल मीडियावर (Social Media) मोठी चर्चा झाली होती. इतकेच नव्हे तर कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदी हिने देखील या लग्नावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काळानुसार बेदी कुटुंबातील हे मतभेद आता दूर झाले असून त्यांचे संबंध सुधारल्याचे चित्र दिसत आहे. कबीर बेदी आतापर्यंत चार वेळा लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचे पहिले लग्न नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांच्याशी झाले होते, त्यानंतर ब्रिटीश फॅशन डिझायनर सुसान हम्फ्रेस आणि टीव्ही प्रेझेंटर निक्की बेदी यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते.

कबीर बेदी हे केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेते आहेत. 'खून भरी मांग' आणि 'ताजमहल: एन इटरनल लव्ह स्टोरी' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अजरामर आहेत. युरोपियन दूरदर्शन मालिका 'संदोकन'मुळे त्यांना प्रचंड आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. तसेच, जगप्रसिद्ध जेम्स बाँड फ्रँचायझीमधील 'ऑक्टोपसी' या हॉलिवूड चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Viral Video: व्हायरल होण्याच्या नादात थेट मृत्यूलाच आमंत्रण! चालत्या ट्रकच्या चाकांमध्ये घुसवली गाडी; थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

Goa Rain 2025: गोव्यात परतीच्या पावसाचा शेतीला मोठा तडाखा! 4 हजारहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान; डिचोलीला सर्वाधिक आर्थिक फटका

Donald Trump: 'नोबेल मिळाला नाही, आता मी शांततेचा विचार करणार नाही'; ट्रम्प यांचं नॉर्वेला खळबळजनक पत्र, ग्रीनलँडवर ठोकला दावा!

Bicholim Mining Protest: पैरातील लोकांचा खाणीविरोधात पुन्हा एल्गार! साळगावकर खाणीचे कामकाज पाडले बंद; प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक

SCROLL FOR NEXT