Salman Khan To Attend IFFI Opening Dainik Gomantak
गोवा

Salman Khan To Attend IFFI Opening: इफ्फीच्या ओपनिंगला बॉलिवूडचा भाईजान 'सलमान खान' लावणार हजेरी

सलमान खानने मात्र याबाबत अद्याप उपस्थिती निश्चित केलेली नाही.

Pramod Yadav

Salman Khan IFFI Opening: गोव्यात होणाऱ्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्धाटन समारंभाला बॉलिवूडचा भाईजान अभिनेता 'सलमान खान' हजेरी लावण्याची शक्यता आहे. सलमान खानने मात्र याबाबत अद्याप उपस्थिती निश्चित केलेली नाही.

गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून 54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला हॉलिवूड अभिनेता आणि निर्माता मायकल डग्लस त्यांची पत्नी हजेरी लावणार आहेत. याचसोबत सलमान खान देखील उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.

सलमानच्या उपस्थिती अद्याप त्याच्याकडून निश्चित करण्यात आलेली नाही, अशी माहिती गोवा मनोरंजन सोसायटीच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, कॅचिंग डस्ट या ब्रिटिश चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात होईल तर, द फेदरवेट या अमेरिकन चित्रपटाने इफ्फीची सांगता होणार आहे. OTT क्षेत्रातील 28 टक्के वार्षिक वाढ लक्षात घेऊन मंत्रालयाने OTT प्लॅटफॉर्मवरील उत्कृष्ट कंटेट निर्मात्यांसाठी पुरस्कार सुरू केला आहे. 15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरून 10 भाषांमध्ये एकूण 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून विजेत्याला दहा लाख रुपयांची रक्कम दिली जाईल, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग ही जागतिक स्तरावर पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ दरवर्षी वाढत आहे. गेल्या तीन वर्षांची सरासरी वाढ पाहिली तर ती वार्षिक 20 टक्क्यांनी वाढली आहे, असेही ठाकूर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT