Bastora Accident  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Accident: चालकाचा लागला डोळा, बस्तोड्यात अपघात

Bastora: बोलेरो जीप चालकाचा डोळा लागल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या जलवाहिनीवर धडकली, सुदैवाने जिवीतहानी टळली

दैनिक गोमन्तक

Bastora: बोलेरो जीप चालकाचा डोळा लागल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या जलवाहिनीवर धडकली. तर जीपमागून येणाऱ्या स्विफ्ट कारची मागून धडक बसून बस्तोडा येथे हा अपघात (Accident) झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या वाहनांतील सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

हा अपघात शनिवारी (ता.3) सायंकाळी 5.20 च्या सुमारास घडला. जीए 04 टी 4940 या क्रमांकाची बोलेरो टेम्पो जीप गिरीहून करासवाडाच्या दिशेने सर्व्हिस रोडवरून जात होती. तेव्हा बस्तोडा येथे जीप चालक सुरेश तेलगिरी (डिचोली)Bicholim याचा गाडी चालवताना चालकाचा डोळा लागला असता, जीप रस्त्यालगत एका जलवाहिनीवर धडकली.

यावेळी मागून येणारी जीए 03 व्हाय 3303 क्रमांकाचा स्विफ्ट कार चालक मतिऊर चौधरी (पश्चिम बंगाल) West Bengal याचा गाडीवरील ताबा गेला व या कारची मागून जीपला धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर दोन्ही चालक तसेच प्रवाशांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस हवालदार उल्हास गावकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT