Kushavati River Flood Dainik Gomantak
गोवा

पुरामुळे घरात अडकलेला मृतदेह अग्निशमन दलाने काढला बाहेर

पारोडा येथे पुरस्थितीने मृतदेह नेणेही झाले होते कठीण

दैनिक गोमन्तक

केपे: गुडी पारोडा ते काराळीपर्यंत तसेच मडगाव ते केपे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पारोडा येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात काल रात्री पारोडा येथील जेष्ठ नागरिक गजानन पडियार यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे आवश्यक होते. या करीता मृतदेह मडगाव स्मशानभूमीत घेऊन जाणे आवश्यक होते. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला. व अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

प्राप्त माहितीनुसार पारोडा येथील रस्ते जलमय झाल्याने गजानन पडियार यांचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी मडगाव येथे नेण्यास मिळत नसल्याने अखेर पडियार कुटुंबियाने सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला. व मदतची मागणी केली असता फळदेसाई यांनी त्वरित अग्निशामक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुडचडे अग्निशामक दलाला मदतीसाठी पाचारण करण्याचे निर्देश देण्यात आले.

मंत्री फळदेसाई यांनी दिलेल्या निर्देशानुसार कुडचडे अग्निशामक दलाने याबाबत तातडीने घटनास्थळी दाखल झाले व अग्निशामक दलाचे दामोदर जांबावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास बोटीच्या सहकार्याने मृतदेह पारोडा येथून काराळी येथे आणण्यात आला व शव वाहिकेत घालून मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT