Goa Accidental Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: पेट्रोलपंप कामगारांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

Goa Accidental Death: गुळे-काणकोण येथील एका विहिरीत मृत कासव काढण्यासाठी गेलेल्या दोन कामगारांचा बुडून मृत्यू होण्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

दैनिक गोमन्तक

Goa Accidental Death: गुळे-काणकोण येथील एका विहिरीत मृत कासव काढण्यासाठी गेलेल्या दोन कामगारांचा बुडून मृत्यू होण्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. त्‍यामुळे एकच खळबळ माजली. संतप्‍त ग्रामस्‍थांनी पेट्रोलपंप कार्यालयाची तोडफोड केली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, नमी गावकर (गुळे-काणकोण) आणि बारकेलो गावकर (गोकुल्डे-बार्शे) अशी मृत कामगारांची नावे आहेत. आज त्यांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्‍यात

आले. एक कामगार पहिल्यांदा मृत कासव‌ काढण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्यानंतर दुसरा कामगार उतरला. दोघांचाही बुडून व गुदमरून मृत्यू झाल्‍याचे वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाले आहे.

दरम्‍यान, ही घटना घडल्यानंतर पेट्रोलपंपवर संतप्‍त जमावाने धाव घेतली. त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. जमावाने पेट्रोलपंप कार्यालयाची तोडफोड केली व मालक तसेच व्यवस्थापकाला घटनास्थळी आणण्‍याची मागणी लावून धरली.

जमावाचा पवित्रा पाहून पोलिसांनी काही नागरिकांना पोलिस स्टेशनवर बोलावून रात्री उशिरा पेट्रोलपंप मालक व‌ व्यवस्थापकाला पाचारण केले. त्यावेळी पेट्रोलपंपच्‍या मालकाने मृत कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे कबूल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT