Rupa Deshprabhu inaugurating the blood donation camp Gomantak Digital Team
गोवा

Blood Donation Camp: रक्तदान ही सामाजिक जबाबदारी; रूपा देशप्रभूंचे प्रतिपादन

रूपा देशप्रभू : जितेंद्र देशप्रभू यांच्या स्‍मृतिप्रीत्‍यर्थ पेडण्यात शिबिर

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. स्व. जितेंद्र देशप्रभू यांच्या जयंतीदिनी व्हायकाऊंट हायस्कूलने जबाबदारी घेऊन हे शिबिर आयोजित केले, हे सामाजिक भान ओळखून केलेले काम आहे, असे प्रतिपादन हायस्कूलच्या ट्रस्टी रूपा देशप्रभू यांनी केले.

व्हायकाऊंट हायस्कूल, व्हायकाऊंट हायस्कूल प्राथमिक विभाग आणि श्री रवळनाथ स्पोर्टस्‌ ॲण्ड कल्चरल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी म्हापसा जिल्हा इस्पितळ रक्तपेढीच्या डॉ. प्रणिता परब, श्री रवळनाथ स्पोर्टस्‌ क्लबचे अध्यक्ष नरहरी पेडणेकर, मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे, प्राथमिक विभाग प्रमुख राजमोहन शेटये, शिक्षक व पालक उपस्थित होते.यावेळी डॉ. प्रणिता परब यांनी रक्तदानाविषयी माहिती दिली. नरहरी पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक प्रकाश नाईक आणि देवेंद्र केपकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत सादर केले. स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र बोंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन राजमोहन शेटये यांनी केले. शिक्षिका इशा परूळेकर यांनी आभार मानले. यावेळी ३५ जणांनी रक्तदान केले. आझिलो हॉस्पिटल आणि श्री रवळनाथ स्पोर्टस्‌ क्लब यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT