Colvale Fire Dainik Goamantak
गोवा

Colvale Fire: 350 बंब संपले तरी आग विझता विझेना, 28 तासानंतरही भंगारअड्डा धुमसतोय

आगीत एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला गोमेकॉत दाखल केले आहे.

Pramod Yadav

Colvale Fire: मुशीरवाडा-कोलवाळ येथील सर्व्हे क्रमांक 429/0 या जागेमधील चार भंगारअड्ड्यांना भीषण आग लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी (ता.28) सकाळी 10.30 वा.च्या सुमारास लागलेल्या या अग्नितांडवावर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाकडून अद्याप सुरूच आहे. 28 तास उलटले तरी आग सुरूच असून, आत्तापर्यंत तब्बल 350 पाण्याचे बंब वापरण्यात आले आहेत. या आगीत एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला गोमेकॉत दाखल केले आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत म्हापसा, पिळर्ण, पर्वरी व पेडणे अग्नीशमन दलाचे मिळून 40 पेक्षा जास्त पाण्याचे बंब वापरले गेले होते. दरम्यान, या घटनेला जबाबदार धरून भंगारअड्डा मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. रफान रिझवान खान यांच्या मालकीच्या भंगारअड्ड्यात सकाळी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी त्याची ठिणगी पडून ही आग लागल्याचे सांगण्यात आले. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण करून इतर शेजारील भंगारअड्ड्यांमध्ये पसरली.

दरम्यान, या आग दुर्घटनेला कारणीभूत रिझवान प्लास्टिक इंडस्ट्री या भंगारअड्ड्याचे मालक रिझवान खान व इरफान रिझवान खान यांच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे आग लागून त्यामध्ये यासिम अन्सारी शेख (उत्तर प्रदेश) हा कामगार जखमी झाल्याबद्दल कोलवाळ पोलिसांनी भा.दं.सं.च्या 285, 337 व 34 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

Margao Fish Market: मडगाव 'मासळी मार्केट'ची इमारत बांधून वर्ष उलटलं, पण उद्घाटनाला मुहूर्त मिळेना! व्यापारी आणि मच्छीमार संभ्रमात

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

Railway Tender Fraud: रेल्वे निविदेच्या आमिषाने साडेतीन लाखांना 'टोपी', पुण्यातील संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

Cortalim Accident: कोटार्लीत 2 दुचाकींच्‍या अपघातात तिघे जखमी, बुलेटचालकाचा निष्‍काळजीपणा; गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT