Black Panther Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ब्लॅक पँथरचा वावर; विश्वजित राणेंनी शेयर केला फोटो

राज्यात झालेल्या व्याघ्र गणने दरम्यान मोले अभयारण्यात कॅमेरा ट्राफमध्ये काळा बिबट्याचा (ब्लॅक पँथर) वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात झालेल्या व्याघ्र गणने दरम्यान मोले अभयारण्यात काळा बिबट्याचा (ब्लॅक पँथर) वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी वनखात्याला बिबट्याच्या हालचालीवर निरीक्षण ठेवण्यासाठी अधिक कॅमेरे लावण्यास सांगितले आहे. याबाबत राणे यांनीच ट्विट करत ही माहिती दिली.

राज्यात झालेल्या व्याघ्र गणने दरम्यान मोले अभयारण्यात कॅमेरा ट्राफमध्ये काळा बिबट्याचा (ब्लॅक पँथर) वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनमंत्री विश्वजित राणे यांनी वनखात्याला बिबट्याच्या हालचालीवर निरीक्षण ठेवण्यासाठी अधिक कॅमेरे लावण्यास सांगितले आहे. याबाबत राणे यांनीच ट्विट करत ही माहिती दिली.

राज्यात वाघेरीसारखे अनेक परिसर आहेत, जे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर होणे गरजेचे आहे. यासाठी येत्या सहा महिन्यांत केंद्र सरकारच्या मदतीने वाघेरी वन्यजीव संवेदनशील परिसर म्हणून जाहीर करणार असल्याची माहिती वनमंत्री राणे यांनी दिली याआधी दिली होती.

राज्यातील म्हादई अभयारण्य आणि अन्य जंगल मिळून व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर होण्यास आपला विरोध असल्याचे सांगत मंत्री राणे म्हणाले होते की, पर्यावरणीयदृष्ट्या वाघ महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच स्थानिक लोकांचे हितसंबंध आणि कल्याण महत्त्वाचे आहे. याकरिता जंगल आणि माणूस यांच्या सहजीवनाला महत्त्व दिले पाहिजे. या परिसराला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याची आवश्यकता नाही. सध्या हा परिसर विविध अभयारण्यांनी व्यापलेला आहे. यापुढेही त्याच पद्धतीने त्याचे संवर्धन आणि संरक्षण केले जाईल. व्याघ्र प्रकल्पासाठी मोठ्या बफर आणि कोअर झोनची आवश्यकता असते. गोवा हे अत्यंत लहान राज्य असले तरी 60 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रीन कव्हर असलेले पहिले राज्य आहे, असेही विश्वजीत राणे पुढे म्हणाले. आता गोव्यात काळा बिबट्याचा दिसल्यानंतर विश्वजित राणे व्याघ्र प्रकल्पाबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT