Black Panther in Dharbandora Dainik Gomantak
गोवा

Black Panther In Goa: धारबांदोड्यात पुन्हा ब्लॅक पॅंथर

Black Panther In Goa: कुत्र्यांवर हल्ला वन खात्याने पहारा वाढविला, सीसीटीव्हीवर मोठी भिस्त

दैनिक गोमन्तक

Black Panther In Goa: धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील वंडाळ्या या गावातील अतुल नाईक यांच्या घरी दुसऱ्यांदा शनिवारी पहाटे ब्लॅक पॅंथर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. जेव्हा ब्लॅक पॅंथर दुसऱ्यांदा घरातील वऱ्हाड्यात आला.

यापूर्वी ब्लॅक पॅंथरने अनेक भटक्या कुत्र्यांवर हल्ला करून कुत्री फस्त केल्याने त्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे घरातील पाळीव कुत्री, मांजरांवर हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी भीती अतुल यांनी व्यक्त केली.

अनेक कुत्रे व पाळीव मांजरे ब्लॅक पँथरने फस्त केली. या भागात ब्लॅक पॅंथरचा संचार वाढला आहे. 4 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा ब्लॅक पॅंथर आमच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. आत्ता सहा दिवसांनी पुन्हा हा ब्लॅक पॅंथर आमच्या घराजवळ आला.

या संदर्भात धारबांदोडा येथील वन खात्यात गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आमच्या घरा भोवती पहारा ठेवला. ज्या दिवशी दुसऱ्यांदा हा पॅंथर आला, तेव्हासुद्धा 3 वा. पर्यंत वन खात्याचा पहारा होता.

वन खात्याचे कर्मचारी गेल्यानंतर पहाटे 4-15 वाजता हा पॅंथर कॅमेऱ्यात कैद झाला, अशी माहिती अतूल यांनी दिली. गेल्या तीन ते चार महिन्यात ब्लॅक पँथरने गावातील पाळीव कुत्री व मांजरांची शिकार केली. या भागात सध्या भीतीचे वातावरण असून त्यांनी ब्लॅक पॅंथरचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

पूर्वी गावात कुठेही बिबटा किंवा ब्लॅक पॅंथर दिसल्यानंतर वन खात्यात तक्रार दिल्यास तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावून हैदोस घालणाऱ्या या रानटी जनावराला पकडत होते. पण गेल्या काही वर्षापासून पिंजरा लावायचा असल्यास वनखात्याकडे अर्ज द्यावा लागतो.

शिवाय या प्रक्रियेत बराच वेळ वाया जातो, त्यामुळे ग्रामस्थांच्या जिवावर बेतू शकते, तेव्हा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, व वन खात्याच्या या धोरणात बदल करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

कर्मचारी तैनात

कुळे वन विभाग आरएफओ रवी शिरोडकर यांच्या मार्गदर्शन खाली आज १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वन कर्मचारी यांनी या ठिकाणी आपले सीसीटीव्ही यंत्रणा सुरू केली आहे. या कॅमेऱ्यातून ब्लॅक पॅथर आल्यास त्याच्या सर्व हालचालीचे फोटो क्लिक होणार आहेत. अतुल नाईक यांच्या घराच्या परिसरात वन खात्याने कडक पहारा ठेवलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT