Sanquelim-Ponda Municipal Council Election Dainik Gomantak
गोवा

Sanquelim-Ponda Municipal Council Election: साखळी पालिकेत भाजपचा दणदणीत विजय! एसटी मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

फोंड्यातील यशा बद्दल रवी आणि सावईकर यांचेही कौतुक

दैनिक गोमन्तक

Sanquelim-Ponda Municipal Council Election: साखळी आणि फोंडा या दोन्ही पालिकात भाजपने निर्विवाद यश मिळविल्याबद्दल भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन केले आहे.

साखळी पालिकेत 12 जागांपैकी 11 जागा जिंकवून देऊन मुख्यमंत्री सावंत यांनी आपले शब्द खरे करून दाखविले. या निकालातून त्यांचे पालिकेवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांची लोकप्रियता त्यातून सिद्ध झाली आहे, असे मात्र बार्बोजा यांनी व्यक्त केले.

फोंडा पालिकेत भाजपने जे यश मिळविले आहे त्याचे सर्व श्रेय मंत्री रवी नाईक व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांना जाते. त्यांनी केलेली ही कमाल आहे, ते खरंच कौतुकास पात्र असल्याचे अँथनी बार्बोजा यांनी म्हटले आहे.

Sanquelim Municipal Council Election Result

दरम्यान, या निवडणुकीत ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाला मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्र. 5 मधील उमेदवार प्रवीण ब्लेगन सोडता यापैकी कुणीही निवडून आलेले नाही. धर्मेश सगलानी यांचाही दारुण पराभव झाला आहे.

वॉर्ड क्र. 1 ते 4 आणि 6 ते 12 मधील सर्व विजयी उमेदवार हे भाजप गटाचे असल्याने साखळीमध्ये भाजपने वर्चस्व मिळवले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT