Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजपकडून आज उमेदवारीवर मोहोर

Goa Politics: दक्षिण गोव्‍यात उत्‍सुकता शिगेला

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

भाजपकडून दक्षिण गोव्‍यातील उमेदवाराचे नाव जाहीर होईल. तर त्‍यानंतर काँग्रेस आपले उमेदवारीचे पत्ते खुले करेल. मंगळवारी गोव्‍यातील प्रमुख पक्षांकडून रिंगणात कोण असेल, याचे चित्र स्‍पष्‍ट होईल.

भाजपच्या पहिल्याच यादीत उत्तर गोवा उमेदवार म्हणून खासदार श्रीपाद नाईक यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर काँग्रेसच्या दोन याद्या आल्या; पण त्यातून काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर झाली नाहीत. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या उमेदवारांची आणि काँग्रेस भाजपच्या दक्षिणेतील उमेदवाराच्या नावाची वाट पाहात आहे, हे स्पष्टपणे दिसू लागले.

भाजपकडून दक्षिणेत महिला उमेदवार दिला जाणार असल्याच्या मताला प्रदेशाध्यक्षांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी महिला उमेदवाराचे नाव दिल्लीतून आल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी रविवारी रात्री ९ वाजता ‘गोमन्‍तक’शी संवाद साधताना सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा यांच्‍या उपस्‍थितीत दिल्‍लीतील पक्ष मुख्‍यालयात केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाची बैठक सुरू आहे. त्‍यात दक्षिण गोव्‍यातील भाजप उमेदवाराच्‍या नावाचा विचार होईल’,

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता, मी मुंबईत असून, उद्या (सोमवारी) दिल्लीला रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या सूत्रांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, ‘पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक मंगळवारी दुपारी तीन वाजता सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालेल. त्यानंतर तिसरी यादी पक्ष जाहीर करेल, त्यात गोव्याच्या दोन्ही उमेदवारांची नावे असू शकतात.’

दिल्लीतील बैठकींना मुख्‍यमंत्री अथवा मला बोलावलेले नाही. मात्र, गरजेनुरूप वरिष्‍ठ पातळीवरून आमच्‍याशी संपर्क साधण्‍यात येईल. आज रात्री उशिरा अथवा सोमवारी निवड जाहीर होईल. - सदानंद तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT