Vijai Sardesai  Dainik gomantak
गोवा

भाजपने विविध प्रश्नांवर गोव्यातील जनतेची लूट आणि फसवणूक केली; विजय सरदेसाई

भाजपने राजकीय फायद्यासाठी आमच्या म्हादईशी तडजोड केली. अनेक भागांना पिण्यायोग्य पाणी पुरवण्यात ते अपयशी ठरले

दैनिक गोमन्तक

विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी आमदार म्हणून मागील दोन कार्यकाळात केलेल्या कामाचे दर्शन घडविणारा एलईडी स्क्रीनही रविवारी अमृतनगर परिसरात फिरत होता. यावेळी त्यांचे समर्थक, नगरसेवक आदी उपस्थित होते.

सरदेसाई यांनी अमृतनगरमधील घरोघरी जावून लोकांना सांगितले की, त्यांचा ‘ लोकांच्या सहमतीने विकास’ यावर विश्वास आहे आणि म्हणूनच तोच मंत्र गेली अनेक वर्षे फातोर्डा येथे पाळला जात आहे.

“लोकांना जो विकास पाहिजे तोच झाला पाहिजे असा माझा विश्वास आहे. यासाठी लोकांना विश्वासात घेऊन व चर्चा करुनच आम्ही विकास करत आहोत. मी हा मॉडेल संपूर्ण गोव्यात नेऊ इच्छितो.” असे सरदेसाई म्हणाले.

गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाचे अध्यक्ष सरदेसाई म्हणाले की, भाजप (BJP) सरकारने विविध प्रश्नांवर गोव्यातील जनतेची लूट आणि फसवणूक केली आहे. “भाजपने राजकीय फायद्यासाठी आमच्या म्हादईशी तडजोड केली. अनेक भागांना पिण्यायोग्य पाणी पुरवण्यात ते अपयशी ठरले आहे.” असे सरदेसाई म्हणाले.

ते म्हणाले की, ‘फ्युचर रेडी फातोर्डा’ फातोर्डातील मुलांना आणि तरुणांना मदत करेल, ज्यातून त्यांना सर्व सुविधा आणि फायदे मिळतील. “आम्ही आमच्या मुलांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, मग ते शैक्षणिक क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र. आपण त्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन दिले पाहिजे.” असे ते म्हणाले.

"असाही वेळ येईल जेव्हा इतर मतदारसंघ फातोर्डाच्या मॉडेलचे अनुसरण करतील आणि आम्ही ते गोव्याच्या प्रगतीसाठी पुढे नेऊ." असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT