AAP  Dainik Gomantak
गोवा

‘कर्नाटक फाईल्स’द्वारे भाजपचा फूट पाडण्याचा प्रयत्न: आप

भाजप केवळ व्होट बँकेचा फायदा घेऊन सत्तेत येण्यासाठी फूट पाडण्याचे डावपेच वापरतो

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपला आगामी निवडणुकीत पराभवाचे वेध लागले आहे. त्यामुळे ते प्रशासनातील अपयशापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध डावपेच आखत आहेत. भाजप गोवा फाईल्सच्या वादातून गोमंतकीयांना धार्मिक स्तरावर विभाजित करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे आता ‘कर्नाटक फाईल्स’ रणनीतीने प्रादेशिक आणि भाषिक आधारावर काही पंचायत क्षेत्रातील मतदारांना विभाजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका आम आदमी पक्षाकडून करण्यात आली.

कन्नड महासंघाच्या नेत्यांनी भाजपच्या या डावपेचातून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. भाजप केवळ व्होट बँकेचा फायदा घेऊन सत्तेत येण्यासाठी फूट पाडण्याचे डावपेच वापरतो, असे अमित पालेकर यावेळी म्हणाले.

भाषिक पातळीवर निवडणूक अवैध

प्रत्येकजण निवडणूक लढवण्यास स्वतंत्र आहे. पण लढण्यामागील हेतू जनतेची सेवा हाच असला पाहिजे. केवळ विशिष्ट भाषा बोलणारे किंवा मूळतः विशिष्ट राज्यातील लोकांचीच नव्हे, तर सर्व लोकांची सेवा करणे हे ध्येय असावे. भाषिक किंवा प्रादेशिक आधारावर मते मिळविण्याचे असे प्रयत्न अयोग्य आहेत, असे पालेकर म्हणाले.

कन्नड महासंघाच्या भूमिकेला विरोध

पंचायत निवडणुकीसाठी केवळ कन्नड उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या कन्नड महासंघाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला असून याला सामाजिक फूट आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ‘आप’चे नेते ॲड. अमित पालेकर म्हणाले की, ग्रामपंचायत हा लोकशाहीचा तळागाळातील घटक आहेत. त्यामुळे गोव्यातील पंचायत निवडणुका या एकमेव निवडणुका आहेत, ज्या पक्षाच्या आधारावर घेतल्या जात नाहीत, जेणेकरून तळागाळातील लोक राजकीय आणि इतर प्रभावांपासून दूर राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT