Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : मडगावच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील

सोनसोडोचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचंही दिगंबर कामत यांचं स्पष्टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat : मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. मी आता भाजपचा एक भाग आहे. निर्णय घेण्यासाठी मी आता एकटाच नाही, असेही कामत मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

मंत्रिपदासंदर्भात कामत म्हणाले, की याविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. केवळ वर्तमानपत्रातून मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री व तिसऱ्या दिवशी मंत्री होणार असे वाचतो. नगरपालिकेसाठी खास कायदा आहे व त्या कायद्यानुसार नगरपालिकेचा कारभार चालू असतो. या कायद्यानुसार नगराध्यक्षाची निवड होईल. सोनसोडो कचरा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देत आहे. त्यासंबंधी प्रक्रिया सुरू झाली असून नगर विकास सचिवांकडे आपली बोलणी चालू आहेत.

व्होकल फॉर लोकल प्रदर्शन रविवारी

सेवा पंधरवडाअंतर्गत 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत दैवज्ञ भवनात व्होकल फॉर लोकल प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्यात स्थानिक महिला मंडळे, एनजीओ, स्वयंसेवी संस्थांतर्फे जे पदार्थ तयार केले जातात त्याचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. शिवाय खास मुलांनी बनविलेल्या वस्तूही प्रदर्शनात विक्रीस ठेवल्या जातील. या प्रदर्शनात 25 ते 30 स्टॉल्स असतील.

मडगाव भाजप घेणार क्षयरोग रुग्णांना दत्तक

देशातील क्षयरोगाच्या संपूर्ण निर्मूलनासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गोव्यातही भारतीय जनता पक्षातर्फे क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्याचे काम सुरू आहे. मडगावातील 11 क्षयरोग रुग्णांनाही दत्तक घेतले जाईल, असे आमदार दिगंबर कामत यांनी जाहीर केले. रविवारी नागरी आरोग्य केंद्रांमध्ये अकराही क्षयरोग रुग्णांना औषधे व गरजेच्या वस्तू पुरविल्या जातील, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT