Philip Neri Rodrigues Dainik Gomantak
गोवा

भाजप आमदार व मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स राष्ट्रवादीच्या वाटेवर

रविवारी फिलिप यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपल्या राजकीय भविष्याबाबत चर्चा केली.

दैनिक गोमन्तक

कुंकळ्ळी: जलस्त्रोत मंत्री व काँग्रेसचा त्याग करून भाजपात गेलेले वेळळी मतदारसंघाचे आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्स यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी फिलिप नेरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपल्या राजकीय भविष्याबाबत चर्चा केली. (Philip Neri Rodrigues News Updates)

आपण वेळळी मतदारसंघातुन निवडणूक लढवावी का? निवडणूक (Election) लढायची झाल्यास अपक्ष म्हणून लढावे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर लढावे यावर फिलिप यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले. कार्यकर्त्यांनी फिलिप यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास आग्रह केला. कार्यक्रर्याच्या निर्णयाला मान देऊन फिलिप सोमवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असून ते आमदारकीचा व भाजपच्या सदस्यपदाचा ही त्याग करणार आहेर. मंगळवारी फिलिप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार असून शुक्रवारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

फिलिप नेरी रॉड्रिग्स काँग्रेस (Congress) पक्षाच्या उमेदवारीवर 2017 च्या निवडणुकीत निवडून आले होते. दोन वर्षा पूर्वी फिलिप नेरी यांनी इतर नऊ काँग्रेसी आमदारासह काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपात प्रवेश केला होता व त्यांना मंत्रीपद ही बहाल करण्यात आले होते.निवडणूक जवळ आल्यावर फिलिप यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात जाण्याचा प्रयत्न केला होता.कांग्रेसने जवळ न केल्यावर फिलिप ने तृणमूलची वाट धरण्याचा प्रयत्न केला होता मात्र फिलिप यांच्या पूर्वीच वेळळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांनी तृणमूल मध्ये उडी घेतल्यामुळे फिलिप ची संधी हुकली होती फिलिप यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा पर्याय खुला ठेवला होता मात्र शेवटी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ स्विकारले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT