मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नाईक यांना फोन करून राजीनामा देण्यास भाग पाडले

 

Dainik Gomantak

गोवा

गोव्याचे वासनाकांड बिहारपर्यंत! भाजप पक्षश्रेष्ठींचा संताप

बैठक संपल्याच्या काही क्षणातच मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नाईक यांना फोन करून राजीनामा देण्यास भाग पाडले. मिलिंद नाईक यांची बाजू ऐकून घेण्याची गरज नाही, एवढे पक्षश्रेष्ठी संतापले आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: वासनाकांड प्रकरणात नगरविकासमंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Election) उमेदवारी डावलण्याची शक्यता आहे. दिल्लीच्याच (Delhi) आदेशावरून नाईक यांचा राजीनामा घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीने हा विषय अत्यंत गंभीरपणे घेतल्याचे स्पष्ट होते.

नाईक यांचा राजीनामा ज्या तीव्रतेने घेण्यात आला तो प्रकार राज्यातील नेत्यांनाही हबकवणारा ठरला. कारण अवघ्या काही तासांपूर्वी पणजीच्या भाजप (BJP) मुख्यालयात झालेल्या बैठकीत मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही. त्यांच्या मागे पक्ष उभा राहील, एवढेच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसविरोधात जंग पुकारावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. कॉंग्रेस पक्षाने मंत्र्याला काढून टाकण्याची केलेली मागणी तर कोणत्याही परिस्थितीत खिजगणितीत घेऊ नये, असाच पक्षाचा या बैठकीतील सूर होता. या बैठकीला संपूर्ण राज्यातील किमान 40 प्रमुख संघटनात्मक नेते उपस्थित होते.

परंतु ही बैठक संपल्याच्या काही क्षणातच मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नाईक यांना फोन करून राजीनामा देण्यास भाग पाडले. मिलिंद नाईक यांची बाजू ऐकून घेण्याची गरज नाही, एवढे पक्षश्रेष्ठी संतापले आहेत. निवडणुकीच्या काळात तर असे कोणतेही किल्मिष पक्षावर येता कामा नये. नाईक यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, असा आदेश मुख्यमंत्र्यांना मिळाल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वरील कारवाई केली.

चौकशी कशी करणार?

सरकारी नोकरभरती घोटाळ्याची चौकशी करण्याचाही दबाव राज्य सरकारवर आहे. देवेंद्र फडणवीस व बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. आज शुक्रवारी गोवा फॉरवर्डसह काही नेते नोकरभरतीप्रकरणी न्यायालयात धाव घेणार आहेत. बाबूश मोन्सेरात यांनी नोकरभरती प्रकरणात केलेले आरोप सीडीच्या माध्यमातून कोर्टात सादर केले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. अशी तक्रार नोंद झाल्यानंतर मात्र सरकारला कारवाई करावी लागेल.

नोकरभरती... मुख्यमंत्र्यांवर दबाव

सरकारी नोकरभरती घोटाळ्याची चौकशी करण्याचाही दबाव राज्य सरकारवर आहे. देवेंद्र फडणवीस व बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. आज शुक्रवारी गोवा फॉरवर्डसह काही नेते नोकरभरतीप्रकरणी न्यायालयात धाव घेणार आहेत. बाबूश मोन्सेरात यांनी नोकरभरती प्रकरणात केलेले आरोप सीडीच्या माध्यमातून कोर्टात सादर केले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. अशी तक्रार नोंद झाल्यानंतर मात्र सरकारला कारवाई करावी लागेल.

मिलिंद नाईक यांच्या समर्थकांकडून वासनाकांडाच्या आरोपाचे खंडन

मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्यावर केलेल्या वासनाकांडाच्या आरोपाचे त्यांच्या समर्थकांनी काल जाहीर सभेद्वारे खंडन केले. तसेच सरकारने या घटनेची कायदेशीर चौकशी करावी. मिलिंद नाईक यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला.

लोकांचा पाठिंबा...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद नाईक यांना मुरगावमध्ये अजूनही लोकपाठिंबा आहे. कॉंग्रेसचे उमेदवार हा मुद्दा घेऊन लढले तरी जिंकण्यापर्यंत त्यांची धाव जाणार नाही. उलट भाजपकडे तयार उमेदवार नसला तरी मुरगाव तालुक्यात भाजपचा प्रभाव आहे. त्यामुळे नवीन उमेदवार उभा करूनही पक्षाचे नुकसान होणार नाही.

निवडणुकीत मुद्दा नाही

‘‘भाजप संघटना कोणत्याही परिस्थितीत मिलिंद नाईक यांच्याबाबत धोका पत्करणार नाही. त्यांना तिकीट नाकारण्याचा एक निर्णय दिल्लीत झाला आहे. त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यास येत्या निवडणुकीतही तो मुद्दा राहणार नाही, असे पक्षाचे मत बनले आहे,’’ अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ सदस्याने दै. ‘गोमन्तक’ला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT