Pramod Sawant and Laxmikant Parsekar  Dainik Gomantak
गोवा

पार्सेकर यांच्या 'घरवापसी'साठी भाजप नेते प्रयत्नशील: प्रमोद सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना परत पक्षात आणण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: मांद्रे मतदारसंघातून उमेरवारीची अपेक्षा असणारे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याऐवजी पक्षाने दयानंद सोपटे यांना उमेदवारी जाहीर केल्याने पार्सेकर नाराज झाले. त्यांनी पक्षाला राजीनामा देऊन आता मांद्रेतून अपक्ष निवडणूक (Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय भाजपला पचवणे कठीण जात आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना परत पक्षात आणण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत.

भाजपचे (BJP) मंद्रेतील उमेदवार दयानंद सोपटे यांच्या उमेदवारी अर्जावेळी पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, “भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि पार्सेकर हे आमचे गोव्यातील सर्वोच्च नेते आहेत. ते माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. पार्सेकर यांच्याशी आमची चर्चा सुरू असून, त्यांना परत भाजपमध्ये आणण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी मला खात्री आहे.

सोपटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकाऱ्यांसमोर उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता कायम राहील, असा विश्वास व्यक्त करून प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले, "मांद्रेला मंत्रिपदाची गरज आहे. मांद्रेतील लोक केवळ आमदारच नव्हे तर मंत्रीही निवडतील. लोकांना विश्वास आहे की गोव्याला केवळ भाजपच स्थिर सरकार देऊ शकतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT