महिलांच्या सशक्तीकरणात भारतीय जनता पार्टी सदैव अग्रेसर आहेत, असे भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस रंजिता पै यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आशा गावस, डॉ. स्नेहा भागवत, रंजिता पै व तनुजा पैंगीणकर उपस्थित होते.  Dainik Gomantak
गोवा

Goa: महिलांच्या सशक्तीकरणात भाजपा अग्रेसर

भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस रंजिता पै, भाजपा सरकाराने देशासह राज्यातही महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यात गृहआधार, लाडली लक्ष्मी, सुकन्या समृद्धी सारख्या योजनांचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: महिलांच्या सशक्तीकरणात (Empowerment of women) भारतीय जनता पार्टी (BJP) सदैव अग्रेसर (Are ahead) आहे. आमच्या पक्षात महिलांना जो मान मिळतो, जे नेतृत्व मिऴते त्याचे अनुकरण आता इतर राजकिय पक्ष करु लागले आहेत असे भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सरचिटणीस रंजिता पै (State General Secretary Ranjita Pai) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपा सरकाराने देशासह राज्यातही महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यात गृहआधार, लाडली लक्ष्मी, सुकन्या समृद्धी सारख्या योजनांचा समावेश आहे. भाजप कदापी महिला विरोधी संस्कृती कधी दाखवूच शकत नाही. भारतीय जनता पक्षामुळेच भारतीय नारी समाजात मानाने जगत आहेत असेही पै यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. असे काँग्रेस म्हणत आहे त्याचा आम्ही निषेध करतो असेही पै हिने सांगितले. या पत्रकार परिषदेत महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. स्नेहा भागवत, मडगाव महिला मोर्चाच्या अध्यक्षा तनुजा पैंगीणकर, फातोर्डा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आशा गावस उपस्थित होत्या.

2005च्या काळात स्व. मनोहर पर्रीकर यांचे सरकार होते. तेव्हाच्या सरकारने राज्याच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या होत्या. तेव्हा मंत्रीमंडळात स्व. पर्रीकर यांनी दिगंबर कामत यांना पहिल्या क्रमांकाच्या मंत्र्याचे स्थान देऊनही ते कॉंग्रेसवासी झाले. त्याच्या या एका निर्णयांने गोव्याचा विकास सात वर्षांनी खुंटला असेही पै यांनी सांगितले.

सदानंद तानावडे हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर वैयक्तिक आरोप भारतीय महिला मोर्चाची राज्य समिती कधीही खपवुन घेणार नाही असे सचिव डॉ. स्नेहा भागवत हिने सांगितले. अशा प्रकारची वक्तव्ये कॉंग्रेसवाले कुठल्या आधारावर करतात हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. मडगावच्या आमदाराने गेल्या 20 वर्षांत शहराचा विकास केलेला नाही उलट मडगावमध्ये त्यांनी उपद्रव मुल्य असलेल्या लोकांना आसरा दिला असेही भागवत यांनी सांगितले.

कामत हे पत्रकबहाद्दर आहेत. पत्रकांच्या माध्यमातुनच ते कॉंग्रेस पक्ष चालवितात असेही भागवत म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT