Vilas Desai GTDC mla Ganesh Gawkar Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Waterfall: ''मुख्यमंत्र्यांची काहीही चूक नाही...''; दूधसागर पर्यटनाच्या वादात सावर्डेतील भाजपाचा अंतर्गत वाद उफाळला!

Goa Tourism Season BJP Conflict: राज्यात सध्या दूधसागर पर्यटन हंगामाच्या वादावरुन भाजपमध्येच जुंपली आहे. सावर्डे मतदारसंघातील भाजपमधील दोन नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

Manish Jadhav

राज्यात सध्या दूधसागर पर्यटन हंगामाच्या वादावरुन भाजपमध्येच जुंपली आहे. सावर्डे मतदारसंघातील भाजपमधील दोन नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दूधसागर असोसिएशनचा वाद मिटवण्यात स्थानिक आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर अपयशी ठरल्याचा घणाघात सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी केला.

एवढ्यवरच न थांबता या वादामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काहीही चूक नसल्याचे देसाई म्हणाले. देसाई यांनी गावंकर यांच्यावर जाहीरपणे टीकास्त्र डागलं. त्यामुळे दूधसागऱ पर्यटनाच्या हंगामाच्या वादावरुन भाजपमधील दोन नेते आमनेसामने आले आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दूधसागर पर्यटन हंगामाचा वाद चांगलाच पेटला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून तोडगा

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी जीटीडीसी आणि टूर ऑपरेटर्स यांच्यातील समस्यांचे निवारण करण्यात आल्याचे आमदार देविया राणे यांनी सांगितले. याशिवाय, वन विभागाकडून दूधसागर पर्यटन हंगाम सुरु करण्यास परवानगी दिल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.

जीटीडीसीचा हस्तक्षेप नको

दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) पर्यटन व्यवसायाची वेबसाईट आहे, ती आमची वेबसाईट आम्हांला परत द्यावी. या ठिकाणी जीटीडीसीचा हस्तक्षेप नको. सरकारला जो काही कर आहे, तो आम्ही भरण्यास तयार आहे, असे जीप टूर ऑपरेटर्सनी सांगितले. आम्हांला जीटीडीसीचा हस्तक्षेप नको, आम्हांला आपण सहकार्य करावे, अशी मागणी अध्यक्ष नीलेश वेळीप आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: BBL सामन्यात खळबळ! पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्सच्या मॅचदरम्यान स्टेडियमला आग; थरारक व्हिडिओ व्हायरल

Dhave: सफर गोव्याची! पणजीतून पहिली कदंबा ज्या गावी आली, सत्तरीतला पहिला मुक्तीसंग्रह जिथे सुरु झाला असे स्वातंत्र्यसैनिकांचे 'धावे' गाव

UAE President India Visit: दोन तासांचा 'सस्पेन्स' दौरा! युएई अध्यक्षांची अचानक भारत भेट; मोठ्या निर्णयाची शक्यता? VIDEO

Goa Noise Pollution: गोव्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही! 36 जणांवर कारवाई करत 20 लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कडक इंगा

Navpancham Rajyoga: राजयोगांचा राजा 'नवपंचम योग'! 30 वर्षांनंतर नशीब चमकवणार शनी-बुध; 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT