Sadananda Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: चिंबल येथे उभारणार भाजपचे मुख्यालय

Goa BJP: सदानंद शेट तानावडे: 500 आसन क्षमतेचे सभागृह; नेत्यांसाठी स्वतंत्र कक्ष

दैनिक गोमन्तक

Goa BJP: पणजी - फोंडा बगल रस्त्यालगत चिंबल येथे उभ्या राहणाऱ्या भाजप गोवा मुख्यालयात 500 आसन क्षमता असलेले सभागृह असणार आहे. राज्यस्तरीय नेत्यांसाठी स्वतंत्र कक्ष आणि माध्यम संवाद कक्षाचीही व्यवस्था या कार्यालयात असेल.

राज्याबाहेरून येणाऱ्या नेत्यांसाठी निवास व्यवस्थाही या कार्यालयात केली जाणार आहे. सध्याचे कार्यालय अपुरे पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

या कार्यालय बांधकामासाठी सर्व परवानग्‍या याआधीच घेण्यात आल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते लवकरच कार्यालय बांधकामासाठी भूमिपूजन केले जाईल असे सांगून ते म्हणाले, भाजपचे मुख्य कार्यालय सध्या पणजीत कार्यरत आहे,

परंतु हे कार्यालय कामासाठी अपुरे पडत असल्यामुळेच चिंबल येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी नवे सुसज्ज असे कार्यालय बांधण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे.

मोदींच्या सभेला 50 हजारांची गर्दी अपेक्षित

येत्या 6 फेब्रुवारीला मडगावच्या कदंब बसस्थानकाच्या जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘विकसित भारत प्रदर्शना’चे उद्‌घाटन व त्याचबरोबर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस 50 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे व त्यासाठी सर्व तयारीला सुरवात झाल्याचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी सांगितले.

मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार नरेंद्र सावईकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, कदंब महामंडळ, सार्वजनिक बांधकाम तसेच पोलिस अधिकारी तयारीची पाहणी करण्यास उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mathura Boat Accident: वृंदावनमध्ये काळजाचा थरकाप! यमुनेत 27 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

VIDEO: सलमान खानचा चढला पारा! चाहत्याच्या 'त्या' कृतीवर भडकला भाईजान; नेटकरी म्हणाले, ''तो तुझा बालपणीचा मित्र आहे का''?

Mumbai Gold Smuggling Bust: मुंबई विमानतळावर 38 कोटींचं सोनं जप्त! डीआरआयकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 26 जणांना ठोकल्या बेड्या

Horoscope April 2026: ग्रहांचा राजा बदलणार तुमचं भविष्य! बँक बॅलन्स वाढणार, नशीब चमकणार; 'या' राशीच्या लोकांची चांदीच चांदी

Mojtaba Khamenei: 'शहीदांच्या रक्ताचा बदला घेणार!' युद्धविरामानंतर खामेनेईंची गर्जना; शत्रूला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं ठणकावलं

SCROLL FOR NEXT