Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

भाजप सरकार विरोधकांची विकासकामे अडवणार नाही: मायकल लोबो

यापूर्वीही तसा प्रकार घडला नाही

दैनिक गोमन्तक

कळंगुट: मी कॉंग्रेससोबत आज विरोधी बाकावर जरी असलो तरी भाजप सरकार कुणाचीच विकासात्मक कामे अडवून ठेवणार नाही. याआधीसुद्धा भाजपकडून तसा प्रकार झालेला नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार आपल्या मतदारसंघाच्या विकासकामाबाबत निश्चिंत असल्याचे मत कळंगुटचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी हडफडेंत सांगितले.

हडफडे पंचायत क्षेत्रातील फेट फिश परिसर (नवीन पूल) ते कळंगुट येथील जांभळेश्वर देवस्थानापर्यंतच्या रस्त्याच्या हॉटमिक्सिंग कामास नारळ वाढवून प्रारंभ केल्यानंतर प्रसार माध्यमांशी लोबो बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत हडफडेचे पंचसदस्य रोशन रेडकर, कळंगुटचे सरपंच शॉन मार्टिन्स, उपसरपंच शेरॉल लोबो, पंचसदस्य दिनेश सीमेपुरुषकर, सालुझिनो फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.

‘टुगेदर फॉर कळंगुट’ लढवणार निवडणूक

राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळंगुट मतदारसंघातील चारही पंचायतींच्या निवडणुका पक्ष पातळीवर नव्हे, तर ‘टुगेदर फॉर कळंगुट’ या बॅनरखाली लढविण्यात येणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. पंचायत निवडणुकीत ‘टुगेदर फॉर कळंगुट’च्याच उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे सांगतानाच यावेळी सक्रिय जुन्या उमेदवारांबरोबरच नवीन उमेदवारांचाही निवडणुकीत सहभाग राहणार असल्याचे स्पष्ट संकेत लोबो यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT