Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Caste Based Census: ...तर जातनिहाय जनगणनेचा विषय विधानसभेत पुन्हा मांडू! सरदेसाईंचे आश्वासन; कांदोळकरांनी केले अभिनंदन

Vijai Sardesai: जनगणनेमुळेच गोव्यात समाजाची टक्केवारी स्पष्ट होईल, असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात भाजप सरकारने जातनिहाय जनगणना सुरू करण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनापूर्वी घ्यावा. अन्यथा तो विषय पुन्हा त्या अधिवेशनात आपण प्राधान्याने मांडू. जनगणनेमुळेच गोव्यात समाजाची टक्केवारी स्पष्ट होईल, असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जातनिहाय जनगणनेचा विषय आमदार सरदेसाई यांनी मांडला होता. हा विषय मांडल्याबद्दल माजी आमदार किरण कांदोळकर आणि दयानंद मांद्रेकर यांनी आमदार सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी सरदेसाई यांनी वरील मत व्यक्त केले.

सरदेसाई म्हणाले, सरकार जर करदात्यांकडून पैसे घेत असेल तर जनगणना करण्यात काय वाईट आहे. समाजाची जनगणना करणे किंवा विविध जाती-धर्माचे लोक किती आहेत, याची आकडेवारी ठेवणे सांख्यिकी खात्याचे काम आहे. जातीनिहाय सर्वेक्षण करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे.

कांदोळकर म्हणाले, भाजपचे अध्यक्षही भंडारी आहेत, त्याशिवाय खासदार आणि आमदारही भंडारी समाजाचे आहेत. आम्ही जातीनिहाय जनगणना करण्याचे निवेदन आम्ही सर्वांना देणार आहोत. २०१४ मध्ये भाजपने सर्व आमदारांना एक खासगी सर्वे केला होता, तो सर्वे बाहेर का आला नाही, का लपविला गेला? असा सवाल त्यांनी केला. सरकारने खासगी संस्थेतर्फे सर्वेक्षणात बीएलओंना सामावून घ्यावे, कारण ते सरकारचे प्रतिनिधी असल्याने कोण कोणत्या समाजाचा हे त्यांना माहीत असते. सरकारने तातडीने जनगणना सुरू करावी‌. अन्यथा भंडारी समाजाची जनगणना करून घेऊ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT