BJP state president Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

आम्ही लोबोंच्या जाण्याचीच वाट पाहात होतो : तानावडे

मायकल लोबोंच्या जाण्याने पक्षाला कोणतेही नुकसान नसल्याचाही दावा

आदित्य जोशी

पणजी : कळंगुटचे भाजप आमदार आणि विद्यमान मंत्री असलेले मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. लोबोंच्या राजीनाम्याचं मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्वागतच झालं आहे. लोबोंच्या जाण्याची वाटच पाहात होतो, अशा शब्दात गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी टोला लगावला आहे. (Michael Lobo Resignation News Update)

मायकल लोबो (Michael Lobo) पक्ष सोडून जाणार हे आम्हाला आधीच माहित होते. त्यामुळे आम्हाला किंवा पक्षाला कोणताही धक्का बसलेला नाही. लोबोंनी भाजप सोडली ते चांगलंच झालं. आम्ही लोबोंनी पक्ष सोडण्याची वाटच पाहात होतो, अशा शब्दात सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी निशाणा साधला आहे.

मायकल लोबो म्हापसा आणि शिवोली भागात प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करत होते. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे आम्हाला कोणताही धक्का बसणार नाही. इतकंच नाही तर शिवोली आणि कळंगुटच्या दोन्ही जागांवर भाजपच (BJP) विजयी होईल असा विश्वासही सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला आहे. मायकल लोबोंची नाराजी दूर करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरच सडकून टीका केल्याचं चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT