Special program at the office of MLA Amonkar Dainik Gomantak
गोवा

BJP Foundation Day 2023 : मुरगाव मतदारसंघात भाजपचा स्थापना दिन उत्साहात साजरा

आमदार आमोणकर यांच्या कार्यालयात विशेष कार्यक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : मुरगाव भाजप मंडळाने मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्यासह मुरगाव येथे भाजपचा 43वा स्थापना दिन उत्साहात साजरा केला. गुरुवारी (ता.6) मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या सडा येथील कार्यालयात भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी मुरगाव भाजप युवा मोर्चाची नवीन समिती जाहीर करण्यात आली.

भाजपच्या 43 व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून गुरुवारी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या सडा येथील कार्यालयात खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी गोवा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, मुरगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय सातार्डेकर, डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, मुरगाव नगरपालिकेच्या नगरसेविका श्रद्धा आमोणकर, मुरगावच्या माजी उपनगराध्यक्ष रीमा सोनुर्लेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुरगाव मतदारसंघातील भाजप युवा मोर्चाची समिती- श्यामप्रसाद महाले (अध्यक्ष), शांती नाईक (उपाध्यक्ष), पांडुरंग पालेकर (सरचिटणीस), कांचन पुजारी (सरचिटणीस), अनिता लमाणी, राजदीप (सचिव).

भाजप स्थापनादिनानिमित्ताने देशात ‘सोशल जस्टीस वीक’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार 6 ते 14 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्याच्या इतर भागांबरोबरच मुरगाव मतदारसंघातही ‘सोशल जस्टीस वीक’ साजरा करण्यात येणार आहे.

- संकल्प आमोणकर, आमदार, मुरगाव मतदारसंघ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT