Goa Congress  Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : गोव्यात काँग्रेस फुटीचे प्रयत्न पुन्‍हा निष्फळ

भाजपच्या पदरी निराशाच; पितृपक्ष लागण्यापूर्वी पक्षाला बळकटी देण्यात अपयश

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : पितृपक्ष महिना लागण्यापूर्वी काँग्रेस पक्षात फूट घालून आठजणांचा गट भारतीय जनता पक्षात विलिन करण्याची स्वप्ने यशस्वी होण्याची चिन्हे पुन्हा मावळली. प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे पाहून कळंगुटचे आमदार मायकल लोबो वालंकिणी येथे तर संकल्प आमोणकर वैष्णोदेवीच्या यात्रेवर निघून गेले आहेत. त्यामुळे दिगंबर कामत अस्वस्थ बनले आहेत.

मंगळवारी दिवसभर कार्लुस फेरेरा व रुडॉल्‍फ फर्नांडिस यांनी काँग्रेसमधला वेगळा गट स्थापन केल्याच्या पत्रावर सही केल्याची चर्चा सुरू होती. परंतु, कार्लुस यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. पक्षांतर केल्याचा परिणाम वाईट होतो आणि जनतेला ते आवडत नाही. गेल्या निवडणुकीत लोकांनी अशा प्रवृत्तीला धडा शिकविला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिल्यानंतर कार्लुस फुटीरांच्या गटातून बाजूला झाल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी बंडखोरांच्या गटात कार्लुस फेरेरा यांचाही समावेश होता. रुडॉल्फ यांच्यासह युरी आलेमाव व एल्टन डिकॉस्‍टा यांनी पक्षाबरोबर ठाम राहण्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे.

गेल्या आठवड्यात दिगंबर कामत हे ज्योकिम आलेमाव यांना भेटले होते. युरी आलेमाव यांचे मन वळविण्याचा तो प्रयत्न होता. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. फुटीर गटाने भाजपात प्रवेश करावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका खनिज निर्यातदारानेही चालू प्रकाराबद्दल उद्वेग व्यक्त केल्याचे वृत्त आहे. या निर्यातदाराने आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु, ज्येष्ठ नेत्यांकडून ज्या सफाईने ही कृती व्हायला हवी होती, त्याचाच अभाव जाणवत असल्याने प्रयत्न निष्फळ ठरल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले आहेत.

राजीनामा देऊ नका!

  • भाजप पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या कथित बंडखोर आमदारांना आमदारकीचा राजीनामा देण्यास मनाई केली आहे.

  • भाजपात यायचे असेल तर आठजणांचा गट घेऊनच यावे लागेल, अशी अट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घातली आहे.

  • गेली दोन महिने त्यासाठी बंडखोरांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दुर्दैवाने कामत यांच्या प्रयत्नांना कोणी फारशी दाद दिलेली नाही. सूत्रांच्या मते, आठजणांच्या गटाला प्रत्यक्षात काय मिळेल, याची शाश्‍वती कामत देऊ शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

SCROLL FOR NEXT