Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

Digambar Kamat : मडगावात भाजपचा आपल्याच नगरसेवकांवर अविश्‍वास

मडगाव नगराध्यक्ष निवडीसाठी वटहुकूम प्रक्रिया, दिगंबर कामतांकडून समर्थन

गोमन्तक डिजिटल टीम

Digambar Kamat : मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीत पाठीराख्या नगरसेवकांची बंडखोरी रोखण्यासाठी भाजप खुल्या पद्धतीने मतदान घेण्‍याच्या प्रयत्नात आहे. यासाठी वटहुकूम काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खुद्द आमदार दिगंबर कामत यांनी त्याविषयी पुष्टी दिली आहे. त्यावरून भाजपचा आपल्या नगरसेवकांवर विश्‍वास नसल्याचे अधोरेखित होत आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी ही लोकशाहीची थट्टा आहे, अशी टीका केली आहे.

मडगाव पालिकेवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. पालिका आपल्या हाती राहावी, यासाठी दिगंबर कामत यांनी वटहुकूम आणून लोकशाहीची हत्या केली आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. यावर ज्याच्याकडे संख्याबळ, त्याच्याकडेच सत्ता, हीच खरी लोकशाही आहे. ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांनी गप्प बसणेच योग्य, अशा शब्दांत कामत यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. कामत म्हणाले, ‘वटहुकूम आणणारा मी कोण? मी तर एक साधा आमदार. आमदार वटहुकूम आणू शकतो का? मात्र, वटहुकूम आला आहे, तो चांगल्यासाठीच आहे. कायद्यात ज्या त्रुटी होत्या, त्या दूर करण्यासाठीच आहे. सरकारने योग्य विचार विनिमय करूनच हा निर्णय घेतला आहे, असे सांगत कामत यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.

विधानसभेला जो कायदा, तोच पालिकेला

मडगाव पालिकेचे उदाहरण देताना कामत म्हणाले, आमच्याकडे 15 नगरसेवक होते; पण त्यातील 10 नगरसेवकांनीच आमच्या उमेदवाराला मत दिले. आता पाचजण का आणि कसे फुटले त्यावर मला बोलायचे नाही; पण हे योग्य आहे का? विधानसभेत सभापतींची जेव्हा निवड होते, त्यावेळी हात दाखवून निवड होत नाही का? विधानसभेला जो कायदा लागू होतो, तोच नगरपालिकेला लागू केल्यास त्यात चूक ती काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

क्लिष्टता कमी करण्याचा प्रयत्न

वटहुकूमाबाबत कामत म्हणाले, नगरपालिका कायद्यात मतदान फक्त मतपत्रिकेद्वारे व्हावे, एवढेच म्हटले आहे. मात्र, काही निवडणूक अधिकारी या कायद्याचा स्वतःला पाहिजे तसा अर्थ काढून मतदान घेतात. या प्रक्रियेत स्पष्टता यावी आणि स्वतःला पाहिजे तसा निर्णय घेतला जाऊ नये, यासाठीच हा वटहुकूम आणून कायद्यातील क्लिष्टता कमी करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. त्यात अलोकशाही कुठेही नाही.

कामत यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांचे ‘गुजरात मॉडेल’

केवळ मडगाव पालिका हातची जाते, म्हणून गुजरातच्या धर्तीवर गोव्यात नगराध्यक्ष निवडण्यासाठी हात दाखवून मतदान करण्यासाठी दिगंबर कामत यांनी हा ‘गुजरात मॉडेल वटहुकूम’ आणला आहे. ते दुसरे-तिसरे काही नसून ती ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आहे, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली. कामत यांचाही राजकीय अंत जवळ आला आहे, असे वाटते. कामत यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे गुजरात मॉडेल आणले आहे, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT