Babu Kavalekar Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: 2027 मध्ये भाजप येणार चौथ्यांदा सत्तेवर! विरोधकांनी सत्तेचे 'दिवास्वप्न' पहावे; कवळेकर यांचा दावा

Babu Kavalekar: माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी सांगितले, की पुढील तीन वर्षांत अनेक निवडणुका होणार असल्याने या समितीला भरीव काम करावे लागेल.

Sameer Panditrao

सासष्टी: माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी सांगितले, की पुढील तीन वर्षांत अनेक निवडणुका होणार असल्याने या समितीला भरीव काम करावे लागेल. डिसेंबर २०२५ मध्ये जिल्हा पंचायत निवडणुका व त्यानंतर नगरपालिका, विधानसभा व पंचायत निवडणुका होणार आहेत. २०२७ सालीसुद्धा भारतीय जनता पक्ष चौथ्यांदा सत्तेवर येईल.

भाजपची संघटना मजबूत आहे. त्यामुळे जे कोणी विरोधक सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहात आहेत ते त्यांचे केवळ दिवास्वप्न असेल, असेही कवळेकर यांनी सांगितले. भाजपची दक्षिण गोवा जिल्हा समिती जाहीर करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपचे राज्य सचिव सर्वानंद भगत यांनी सांगितले, की भारतीय जनता पक्ष हा लोकशाही पद्धतीने वावरणारा पक्ष असून पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सप्टेंबर २०२४ पासुन सुरू झाली होती. सध्या बुथ, मंडळ व आता जिल्हा समित्या जाहीर झाल्या आहेत. चाळीसपैकी ३३ मंडळाच्या समित्या जाहीर झाल्या असून उर्वरित सात समित्या उद्यापर्यंत जाहीर होतील व नंतर प्रदेश समिती निवड प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल. सध्या भाजपचे राज्यात ४.२८ लाख सदस्य, तर ३२१६ सक्रिय सदस्यांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT