Pallavi Dempo- South Goa BJP Candidate Dainik Gomantak
गोवा

South Goa BJP Candidate: अखेर सस्पेन्स संपला! पल्लवी धेंपेच भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार

South Goa BJP Candidate: भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी महिलेच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना केल्यानंतर प्रदेश पातळीवरून त्यांच्या नावाचा विचार झाला होता.

Ganeshprasad Gogate

South Goa BJP Candidate: कित्येक दिवस दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघातला उमेदवार कोण याबाबत चर्चा रंगत होती. स्थानिक भाजपकडून दक्षिण गोव्यासाठी उद्योजक पल्लवी धेंपे यांचे नाव पुढे केले गेले होते.

अखेर रविवारी भाजपकडून दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघासाठी पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

पल्लवी धेंपे या उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी महिलेच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना केल्यानंतर प्रदेश पातळीवरून त्यांच्या नावाचा विचार झाला होता.

त्यांनी दिल्ली येथे जाऊन भाजपचे प्राथमिक सदस्यत्वही स्वीकारले होते. भाजपने सुरवातीला या उमेदवारीसाठी माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक यांच्या नावांचा विचार चालविला होता.

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हेही उमेदवारीसाठी इच्छुक होते, तर मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर यांनी निवडणूक लोकसभा निवडणूक लढविण्यात आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून या उमेदवारीसाठी महिलेच्या नावाचा विचार करण्यात आला होता. सुरवातीला शेफाली वैद्य यांचे नाव समोर आले होते.

त्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांच्यापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्या नावांची चर्चा या उमेदवारीसाठी सुरू झाली होती.

मात्र अखेर आज रविवरी (24 मार्चला) दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून पल्लवी धेंपेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT