Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

'भाजप आणि काँग्रेसने गोव्यातील लोकांसाठी काहीही केलेले नाही'

असे म्हणत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मतदारांना येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत 'आप'ला (AAP) संधी देण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल शनिवारी दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आले आहेत. याकाळात त्यांनी घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार केला. केजरीवाल यांनी सांता क्रुझ येथे तरुणांसोबत सभा घेतली आणि शिरोडा येथे प्रचार केला. (Arvind Kejriwal Goa Election Latest News)

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मतदारांना येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत 'आप'ला (AAP) संधी देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आश्वासनांचा पाढा वाचून दाखवला. "बदलासाठी मतदान करण्यासाठी लोक उत्साही आहेत. भाजप आणि काँग्रेसने या लोकांसाठी काहीही केले नाही. तरुण घरी बसले आहेत कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे," केजरीवाल म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "गोव्यात 'आप'चे सरकार आले तर पर्यटन क्षेत्र विकसित केले जाईल. गोव्यात 24 तास मोफत वीज आणि पाणी दिले जाईल. रस्ते सुधारले जातील आणि सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल. उत्तम आणि मोफत आरोग्य सेवेसाठी गोव्यातील प्रत्येक गावात आणि जिल्ह्यात मोहल्ला दवाखाने आणि रुग्णालये उघडली जातील. शेतकरी वर्गाशी चर्चा करून शेतीचे प्रश्न सोडवले जातील. व्यापार व्यवस्था सुव्यवस्थित आणि सरलीकृत केली जाईल."

त्यांनी शिरोड्याचे उमेदवार महादेव नाईक यांच्यासोबत प्रचार केला. "आम आदमी पक्षाकडून खूप अपेक्षा आहेत, आणि जर 'आप'ने सरकार स्थापन केले तर आम्ही या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. लोकांना प्रामाणिक पर्याय हवा आहे," असे ते म्हणाले. 'आप'ने गोव्यात (Goa) अनेक निवडणूक आश्वासने जाहीर केली आहेत, ज्यात दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत तीर्थयात्रा, स्थानिकांना रोजगार हमी आणि 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना यांचा समावेश आहे. याचबरोबर त्यांनी गृह आधार भत्ता 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये प्रति महिना करण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT