NEET Protest In Goa Dainik Gomantak
गोवा

NEET Protest In Goa: 'नीट'आंदोलनाआडून राष्ट्रविरोधी अजेंडा? पणजी अन् म्हापशातील आंदोलनावर भाजपचा थेट हल्लाबोल

Political Agenda Behind NEET Protest: त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ‘नीट परीक्षेचा उमर खालिद किंवा शर्जील इमाम यांच्याशी काय संबंध?

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाचा गोव्यात काही राष्ट्रविरोधी प्रवृत्तींकडून राजकीय आणि वैचारिक अजेंडा राबविण्यासाठी गैरवापर करण्यात आला. पणजी व म्हापसा येथे झालेल्या आंदोलनात ‘नीट’ परीक्षेशी कोणताही संबंध नसलेल्या उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्या समर्थनार्थ फलक झळकवण्यात आले.

यावरून हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी नसून एका ठरवून आखलेल्या कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. कुंकळ्येंकर म्हणाले की, ‘नीट’ परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या भावना रास्त आहेत.

केंद्र सरकारनेही या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली असून परीक्षा सुधारणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र, गोव्यातील आंदोलनात विद्यार्थ्यांची संख्या आणि भावना यांचा वापर करून वेगळाच राजकीय अजेंडा पुढे रेटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, ‘नीट परीक्षेचा उमर खालिद किंवा शर्जील इमाम यांच्याशी काय संबंध? विद्यार्थी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले होते की दिल्ली दंगलीतील आरोपींच्या सुटकेची मागणी करण्यासाठी?’ अशा घोषणा, फलक विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आणणे म्हणजे फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने सरकार व गोवा पोलिसांकडे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली असून निधीचा स्रोत व बाहेरील संपर्क यांचा तपास करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT