Bird week in india, salim ali jayanti, indian ornithology week Dainik Gomantak
गोवा

Bird week in India: 'चला, पक्षी वाचवूया, निसर्ग जपूया'! पक्षीशास्त्राचे जनक 'डॉ. सलिम अली' यांचे स्मरण

Salim Ali Jayanti: भारतामध्ये दरवर्षी ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो. या आठवड्याचे आयोजन प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलिम अली यांच्या जयंतीनिमित्त केले जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

उमेश शिरगुप्पे

भारतामध्ये दरवर्षी ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा केला जातो. या आठवड्याचे आयोजन प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलिम अली यांच्या जयंतीनिमित्त केले जाते. डॉ. सलिम अली यांना ‘भारतीय पक्षीशास्त्राचे जनक’ म्हणून ओळखले जाते.

या आठवड्यात शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्था पक्ष्यांविषयी जनजागृती करतात. पक्षीनिरीक्षण, चित्रकला, निबंध स्पर्धा, व्याख्याने, आणि पक्ष्यांसाठी पाणपोई उभारणी अशा विविध उपक्रमांद्वारे पक्ष्यांचे महत्त्व समजावले जाते. पक्षी निसर्गाचे सौंदर्य वाढवतात तसेच पर्यावरणाचे संतुलन राखतात. ते कीटक खातात, बीजप्रसार करतात आणि शेतीला मदत करतात. त्यामुळे पक्ष्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

चला, पक्षी वाचवूया, निसर्ग जपूया!

सप्ताहात पक्षीनिरीक्षण शिबिरे, शाळांमध्ये निबंध, चित्रकला व घोषवाक्य स्पर्धा, पक्ष्यांवरील माहितीपट दाखवणे, वृक्षारोपण आणि पक्ष्यांसाठी पाणपोई उभारणी, निसर्गभ्रमंती व पक्ष्यांची ओळख शिकवणे आदी उपक्रम राबवता येऊ शकतात. निसर्गप्रेमी तथा पक्षीप्रेमींनी याबाबतीत पुढाकार घेतलाच पाहिजे, शिवाय सरकारनेही नामशेष होत असलेल्या पक्षांच्या प्रजातींचे संरक्षण करणे काळाची गरज आहे.

‘टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर’

नीलिमा ‘टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर’ हा फ्लायकॅचर कुटुंबातील चिमणीच्या आकाराचा एक छोटासा पक्षी. जेमेतेम ६ इंच/ १५ सेंमी. लांब आकाराचा असावा. याचे मराठी नाव निलीमा असे आहे. हा पक्षी कीटकभक्षक प्रजाती आहे. तो भारत, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या देशात घनदाट झाडी आणि जंगलातही आढळतो. नीलिमा पक्षी निळ्या रंगाचा असून त्याच्या मान-गळ्याला नारंगी रंग आहे. पोटाखालचा भाग पांढरा असतो. याची मादी फिकट रंगाची असते. हा पक्षी उडणाऱ्या माश्या आणि कीटकांसह जमिनीवरचे किडेही खातो. लालसर तपकिरी ठिपके असलेली याची अंडी असतात.

- धीरज वाटेकर, पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ता

पक्ष्यांचे पर्यावरणातील योगदान:

पक्षी कीटकनाशकाचे काम करतात (शेतीचे रक्षण), ते परागीभवन आणि बीजप्रसार करतात. निसर्गातील खाद्यसाखळी टिकवतात. निसर्गाचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला आनंद देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

SCROLL FOR NEXT