Agonda Beach Dainik Gomantak
गोवा

Agonda Beach: जैवविविधता समिती सदस्यांची आगोंद समुद्र किनाऱ्याला भेट

आगोंद समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी समुद्रकाठच्या जमिनीचे संरक्षण गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

Agonda Beach: आगोंद समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी समुद्रकाठच्या जमिनीचे संरक्षण गरजेचे आहे. या अनुषंगाने केंद्रीय जैवविविधता समितीच्या आदेशानुसार आज समितीच्या तांत्रिक विभागाचे अभियंता चिन्मय मोरजकर यांनी आगोंद समुद्र किनाऱ्याला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी सरपंच फातिमा रॉड्रिग्स, उपसरपंच प्रितल फर्नांडिस, सचिव अमोल नाईक गावकर, स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाबा नाईक गावकर, सदस्य नारायण देसाई, सूरज नाईक गावकर, प्रकाश फळदेसाई, विनोद फळदेसाई, आदी उपस्थित होते.

आगोंद समुद्र किनाऱ्यावरील जमिनीची धूप होत असून या ठिकाणी असलेली माडाची झाडे दर पावसाळ्यात कोसळत असतात. ही बाब केंद्रीय जैवविविधता व्यवस्थापन समितीला या अगोदर आगोंद जैवविविधता व्यवस्थापन समितीने पटवून दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीचे सचिव प्रदीप सरमोकादम आणि इतरांनी २७ एप्रिल रोजी पाहणी केली होती.

पावसाळ्यापूर्वी होणार काम

हा समुद्र किनारा १२० बाय १० मीटर ज्यूट टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा पाषाणी दगड वापरून या पावसाळ्यापूर्वी सुरक्षित करण्यात येणार असल्याचे मोरजकर यांनी सांगितले. याच ठिकाणी एक ओहोळ असून ते ठिकाण गलिच्छ झाले आहे. त्या ओहोळातील गाळ उपसून ओहोळाच्या काठी असलेले दगड नव्याने बांधून, तसेच झुडपे काढून साफसफाई करण्यात येणार आहे. हे सर्व काम पावसाळ्यापूर्वीच करण्याचा मनोदय अध्यक्ष शाबा नाईक गावकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT