Goa Accident in Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : चोर्ला घाटातील अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

गोवा-बेळगाव मार्गावरील चोर्ला घाटात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : गोवा-बेळगाव मार्गावरील चोर्ला घाटात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. रविवारी कुणकुंबी येथील चेकपोस्टजवळ अपघात होऊन दुचाकीवरील काशिनाथ प्रकाश गावडे (23, रा.चिगुळे, कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला महेश रामचंद्र गावडे (29) हा गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ व महेश गावडे हे दोघे चुलत भाऊ हणजूण येथील एका रिसॉर्टमध्ये काम करायचे. गणेश चतुर्थीसाठी दोघेही गावी गेले होते. आज दुपारी 1 च्या सुमारास गोव्याकडे येत असताना कुणकुंबी येथील चेकपोस्टजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गाडी चालवत असलेला काशिनाथ जागीच ठार झाला. तर जखमी झालेल्या महेशला उपचारासाठी बेळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घाटातील रस्त्यावर काही ठिकाणी खडी पसरल्याने वाहने घसरत आहेत. शिवाय पावसामुळे पडत असलेल्या धुक्यामुळे रस्ताही अस्पष्ट दिसतो.

दरम्यान ओपा-खांडेपार तिठ्यावर गुरुवारी एका कारचालकाने दोन दुचाकी व एका ट्रकला धडक देत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचाऱ्याला ठोकरल्याने हा पादचारी व कारचालक दोघेही जखमी झाले. दोघांनाही उपचारांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले.

जीए 07 के 5680 या क्रमांकाच्या कारगाडीने चुकीच्या मार्गाने जाऊन खांडेपार येथीलच उदय नागेशकर (57) यांना ठोकर दिली. त्यानंतर एका ट्रकला व दोन दुचाकींनाही या कारचालकाने ठोकरले व स्वतःही जखमी झाला. या अपघातात उदय नागेशकर गंभीर जखमी झाले तर कारचालक अशोक नाईक (66, पाळी) हासुद्धह जखमी झाला. दोघांनाही फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: विकास नेमका कोणासाठी?

Swamala Campaign: 150 वर्षांचा आयुर्वेदिक वारसा अन् परेश रावल यांची साथ! 'स्वमाला'साठी धूतपापेश्वरची नवी मल्टिमीडिया मोहीम

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT