Karmalghat Accident Dainik Gomantak
गोवा

Karmal Ghat Accident : करमलघाटात भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची धडक

गंभीर जखमी दुचाकीस्वाराला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

Bike Hitting Truck At Karmal Ghat : करमलघाटात महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने सोमवारी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमी दुचाकीस्वाराल गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काणकोण येथील करमलघाटात एक ट्रक गेले आठ दिवस बंद अवस्थेत उभा आहे. वास्को येथे कामानिमित्त जाताना नितेश वेळीप या युवकाच्या दुचाकीची धडक ट्रकला बसली. दुचाकीचालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाला.

या अपघातात दुचाकीच्या प्रथमदर्शनी भागाचे नुकसान झाले तर गंभीर दुचाकीस्वाराला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर एक कारची धडक या ट्रकला बसली. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

या महामार्गावर अनेक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभे असतात. त्यामुळे अपघात सुरुच आहेत. संबंधित प्रशासनाने या प्रकरणावर लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी स्थानिक व दुचाकीचालकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT